गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावर शरद पवारांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डी.एस.सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी हा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील चेंबुरचे रहिवासी असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस स्थानकात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सावंत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका फेसबुक युजर्सने शरद पवार यांचे काही आक्षेपार्ह फोटो शेअर केले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शरद पवारांची विरोधी पक्षातील नेत्यांसह बैठक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. यासह निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही पवार यांची तीन वेळा भेट घेतली होती. या बैठकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरा मोर्चा तयार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तथापि, विरोधी पक्षांच्या बैठकींमधून कॉंग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *