ताज्याघडामोडी

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई 

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

वाळूसह पिकअप ताब्यात तर चालक पसार 

पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एक टाटा कंपनीचा पिकअप वाळूसह ताब्यात घेण्यात आला असून पोलीस आल्याचे दिसताच सदर वाहनाचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
       पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना मुंढेवाडी येथून एक पिकअप अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.सदर ठिकाणी तात्काळ जाऊन कारवाई करण्याच्या सूचना मिळताच  शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता पो.कॉ.भराटे,पो.कॉ.मोरे,पो.कॉ.ठाणेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना टाटा झुनल कंपणीचा पिकअप त्याचा आरटीओ पासिंग नंबर- MH-,AQ,9925 या वाहनातून मुंढेवाडी येथिल खटकाळवस्ती जवळ भिमानदीपात्रात यातील आज्ञात चालक व मालक यांनी संगणमत करून स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचे परवानगी शिवाय,विनापरवाना, पर्यावरणाचा-हास होईल हे माहित असताना देखील चोरून घेवुन जात असताना मिळुन आला. 
      पोक/25हंणुमत गोरख भराटे ने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी सरकार तर्फे भा द वि 379,34 सह गौण खनिज कायदा1978चे कलम 4(1),4(क),(1),व 21 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *