ताज्याघडामोडी

कोव्हिशील्डचा पहिला डोस कोवॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी- ICMR

देशात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. देशात सध्या कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लसींचे डोस नागरिकांना दिले जात आहेत. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचे डोस कमी पडत असल्याने लसीकरण अभियान थंडावले आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसींच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे. यावर आता भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थाचे (ICMR) डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर यासाठी वाढवण्यात आले कारण पहिल्या डोसमुळेमध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे, असे सांगितले.

कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १८ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे कारण पहिलाचं डोस व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करत आहे.परंतु कोवॅक्सीन लसींच्या दोन डोसमधील अंतर अद्याप वाढवण्यात आले नाही यावर बोलताना डॉ. भार्गव म्हणाले की, कोवॅक्सीनच्या पहिल्या डोसनंतर रोग प्रतिकारशक्ती कोविशिएल्डपेक्षा वेगवान विकसित होत नाही. त्यामुळे कोवॅक्सिनच्या दोन डोसदरम्यानचे अंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंतच ठेवले आहे.

समित्यांच्या शिफारशीनंतर हे अंतर वाढविले

डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोविशिल्टच्या दोन डोसमधील तीन महिन्यांच्या अंतरामुळे चांगले परिणाम दिसत आहेत. यावर डॉ. भार्गव यांनी असा दावा केला की, कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर प्रतिकारशक्तीची पातळी तितकी जास्त वाढली नाही. याचा अर्थ कोवॅक्सिनचे दुसरा डोस ४ आवठवड्यानंतर घेतल्यावरच या लसीचा परिणाम सुनिश्चित करण्यात येत आहे. तर कोव्हिशील्डचा पहिलाच डोस कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी ठरत असून पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

दरम्यान डॉ. भार्गव सांगतात की, ‘लसींचे डोस पहिल्यांदा १५ डिसेंबरला भारतात आले. यावेळी लसीकरणाबाबतीत आम्ही खूप नवीन आणि शिकत आहोत. अद्याप या लसींवर अभ्यास सुरु असून यातून सतत नवनवीन गोष्टी बाहेर येत आहे.

कोवॅक्सिनचा पहिला डोस दिल्यानंतर शरीरात जास्त अँटीबॉडीज मिळत नाहीत परंतु दुसर्‍या डोसनंतर अँटीबॉडी वाढत आहे. परंतु कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसनंतरच अँटीबॉडी अधिक वाढत आहेत. यावर भार्गव म्हणाले की, कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर हे कोविड वर्किंग ग्रुप, कोविड-१९ वरील राष्ट्रीय तज्ज्ञ समिती (NEGVAC) आणि नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप या तीन समित्यांच्या शिफारशीनंतरच वाढवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *