ताज्याघडामोडी

स्पुटनिकचे v चे 30 लाख डोस भारतात दाखल 

कोरोनाला रोखण्यासाठी रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे 30 लाख डोस आज हैदराबादमध्ये पोहोचले. डॉ. रेड्डीज लॅबरेटरीजने हा साठा आयात केला असून रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडबरोबर झालेल्या करारानुसार रेड्डीज देशात एकूण 250 मिलियन डोस आयात करणार आहे. आतापर्यंत देशात आयात करण्यात आलेला हा सर्वात मोठा लस साठा आहे.

कोरोना रोखण्यासाठी हिंदुस्थानी सरकारने स्पुटनिक लसीचा वापर करायला राज्यांना परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत हा साठा मागवण्यात आला आहे. जीएमआर हैदराबाद एअर कार्गोने आज दुपारा हा साठा हैदराबाद विमानतळावर उतरला. तिथून अवघ्या 90 मिनिटांत हा साठा कार्गोतून उतरवून साठवणुकीच्या ठिकाणी नेण्यात आला. यासाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमान असलेले विशेष कोल्ड स्टोअरेज सज्ज ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *