ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी पालकमंत्र्यांनी केले उद्‌घाटन ;

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस  पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी
पालकमंत्र्यांनी केले उद्‌घाटन ;
पंढरपूर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त  प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे हा वर्धापन दिन दि. 10 जून ते 20 जून असा माणूसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने ही महाभव्यदिव्य रांगोळी साकारून यातून  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत व कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सफाई कामगार यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे ऋण पंढरपूर शहरात प्रथमच 45 बाय 25 अशी मोठी रांगोळी साकारून व्यक्त करण्यात आले. या रांगोळीचे उद्‌घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते करण्यात आले.
या भव्य रांगोळीत पंढरपूरचे आराध्यदैवत श्री विठुराया तसेच वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व सफाई कामगार, मा.पवारसाहेब, आरोग्यमंत्री राजेश टोपेसाहेब व आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी दिंडी यांच्या चित्रांचा या रांगोळीमध्ये समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जो उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पंढरपुरात राबविण्यात आला तो महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखा आहे. यापुढे ही राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करून पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष  युवराज पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड, शहराध्यक्ष सुधीर भोसले, सुवर्णा बागल, ओबीसी जिल्हाध्यक्षा साधना  राऊत, युवती प्रदेश संघटक चारुशिला कुलकर्णी, युवती जिल्हा अध्यक्ष श्रेया भोसले, मोहम्मद उस्ताद, युवक सरचिटणीस प्रशांत बाबर, तालुकाध्यक्ष विजय देशमुख, समता परिषदचे कार्याध्यक्ष अनिल अभंगराव, कोळी समाजाचे नेते अरुण कोळी,नेते दीपक पवार,युवक अध्यक्ष स्वप्नील जगताप,युवती तालुकाध्यक्ष कीर्ती मोरे,महिला शहराध्यक्ष संगीता माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना श्रीकांत शिंदे यांनी पक्षाचा वर्धपान दिन हा माणुसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी म्हणून साजरा करा हे आदेश आल्यानंतर गेली दोन वर्षे पंढरपूर येथे एकही दिंडी आली नाही व कोरोनाच्या काळात ज्या प्रशासकीय अधिकारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा सन्मान करण्याचे काम केलेले आहे. पालकमंत्री भरणे मामा यांनी पंढरपूरमध्ये भव्य प्रशासकीय इमारत उभी राहावी यासाठी प्रयत्न करावेत व जे महादेव कोळी बांधव यांचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही त्यांना ते तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली असे सांगितले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका सफाई कामगार, 108 रुग्णवाहिका ड्रायव्हर ,वैद्यकीय अधिकारी, सामाजिक संघटना ,अरूण कोळी, संजय ननवरे ,सुरज पालवे, रॉबिनहूड आर्मी, छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ, मुजुद्दीन कमलेवाले, सुरज राठी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संतोष बंडगर,दादा थिटे,सुरज पालवे,निलेश कोरके,राधा मलपे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *