ताज्याघडामोडी

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. दीपक सावंत यांनी, पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान गेल्या आठ दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करावी असे आवाहन सावंत यांनी केले आहे.

विशेष म्हणजे सावंत यांनी दि. 16 जानेवारी व दि. 16 फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस घेतले होते.

एक महिन्यापूर्वी त्यांच्या शरीरात 268 अँटीबॉडीज होत्या. तरी पुन्हा करोनाची लागण झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकते बाबत आयसीएमआरने निकष ठरवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. दीपक सावंत यांनी करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. मळम कोरोनाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी दि. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणार होता. मात्र सदर कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *