Uncategorized

व्होळे येथील अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई

भीमा नदीकाठी वाळू चोरांचा सुळसुळाट कायम असून गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पंढरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा अंतर्गत असलेल्या चारही पोलीस ठाण्याकडून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी वारंवार कारवाया होत असताना देखील वाळू चोर मागे हटत नाहीत असेच वारंवार होणाऱ्या कारवायांतूनच दिसून येत आहे.पंढरपुर तालुक्यातील व्होळे येथे केलेल्या कारवाईत  हिरव्या रंगाचा आरटीओ नंबर नसलेला ट्रक्टर डम्पिंग ट्रॉली व वाळूसह ताब्यात घेण्यात आला आहे.  
      या बाबत पोलीस कॉन्स्टेबल सज्जन आबाराव भोसले(नेमणूक करकंब पोलीस ठाणे ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार व्होळे येथील  नामदेव होळकर गट नंबर 121 त्यांचे शेतातील कच्च्या रस्त्यामध्ये भिमा नदीकडे जाणा-या रस्त्यावर १ जून रोजी रात्री ११;४५ वाजता एक बिगर नंबरचा डंपिंग ट्रली मिळुन आली त्याचे जवळ जावुन तपासले असता त्यामध्ये वाळु भरल्याचे दिसुन आले.सदरच्या डंपिंग ट्रॉली जवळच मंगेश हणुमंत होळकर उभा होता,त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरच्या ट्रक्टरचा मालक असल्याचे त्याने सांगीतले. सदरच्या वाळु वाहतुकीबाबत त्यांना परवानाबाबत विचारणा केले असता परवाना नसल्याचे सांगीतले. तसेच सदरचा डंपिंगचा ट्रक्टरबाबत विचारणा केली असता ट्रक्टरचा मागचा टायर रात्रीच पंक्चर झाल्याने तो पंक्चर काढणेसाठी गुरसाळे कारखाना येथे लावुन आल्याचे सांगीतले. त्यानंतर होम/2484 नामदे यांना फोनव्दारे सदरच्या ठिकाणी कारखान्यासमोर जावुन ट्रक्टरची माहीती घेणेकरीता सांगीतले असता. होम/2484 नामदे यांनी सांगीतले की कारखानासमोर असलेले पंक्चरच्या दुकानासमोर एक हिरव्या रंगाचा ट्रक्टर उभा असुन पंक्चर दुकानाचे मालक भैय्या पाटील, गुरसाळे यांनी सांगीतले की, सदरचा ट्रक्टर मंगेश होळकर यांनीच रात्रीच फोनकरुन पक्चंर करीता लावुन गेला असल्याची माहीती दिली. त्यांचे असता सदरचा लागलीच सदरच्या इसम मंगेश होळकर यांनी त्यांचेकडेच ट्रक्टरची चावी असल्याचे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन सदरच्या ट्रक्टर ताब्यात घेवुन सदरच्या डंपिंग ट्रलीच्या ठिकाणी आणला. त्यानंतर सदर इसम यांचे ताब्यातील ट्रक्टरच्या डंपिंग जोडुन त्यामधील वाळु ताब्यात मिळाला माल खालीलप्रमाणे 1)4,50,000/-रु किंमतीचा जन डिअर 5055 ई कंपनीचा हिरव्या रंगाचा ट्रक्टर आरटीओ नंबर नसलेला व त्याचे पाठीमागील बाजुस हिरव्या रंगाचा बिगर नंबरचा डंपिग ट्रालीसह असा जुवाकिअं2) 6000/- रु किंमतीचा डंपिंग ट्रलीमधील एक ब्रास वाळु जुवाकीअं एकुण – 4,56,000/- वरील वर्णनाचा नमुद मुददेमाल दोन पंचासमक्ष पंचनामा करुन पोना/1897 जाधव यांनी ताब्यात घेवुन आरोपीसह सोबत वाहन चालवुन पोलीस ठाणे येथे नेण्यात आला.
या प्रकरणी मंगेश हणुमंत होळकर,वय- 32 वर्षे, व्यवसाय- ड्रायव्हर रा.व्होळे ता.पंढरपुर जि.सोलापुर विरुध्द भिमा नदीचे पात्रातुन बेकायदेशीर वाळु उपसा करुन वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने भादविसं कलम 379 सह गौण खनिजे सुधारीत अधिनियम 2015 चे कलम 4(1),4(क)(1),21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *