पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात येऊन तुम्ही माझी तक्रार का दाखल करून घेत नाही असा प्रश्न विचारत ठाणे अंमलदाराच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याच्या ठाणे अमंलदाराकडून तीनच दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी तानाजी कांबळे व त्यांच्या पत्नी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली भादंवि ३०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज याच प्रकरणाचा दुसरा अध्याय समोर आला असून तानाजी कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मी टाकळी येथील १७ जणांविरोधात अट्रोसिटी कायद्यासह भादंविच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत तानाजी गोविंद कांबळे वय 42 वर्षे रा. लक्ष्मी टाकळी ता.पंढरपुर यानी दाखल फिर्यादी नुसार फिर्यादीची मौजे कासेगाव ता. पंढरपुर गावचे शिवारात जमीन गट नं. 2020/2/2ब व 2021/1ची मीऴुन फिर्यादीच्या मालकीची 03 एकर शेत जमीन असुन शेतातच वस्ती करुन ते पत्नी राणी, आई रुक्मीणीबाई, मुलगा प्रथमेश मुलगी प्रज्ञा,व प्रणाली असे एकत्रात राहतात व शेती करुन कुढुंबाची उपजिवीका भागवतात.त्यांच्या शेतजमिनीत वहिवाट करण्यास व कसण्यास वेळावेळी विरोध करून विविध प्रकारे अडथळे आणत मोठे आर्थिक नुकसान केल्याची फिर्याद तानाजी कांबळे याने तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.