

पंढरपुर तालुक्यातील भीमा व माण नदीच्या काठावरील विविध गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यात पोलीस प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात यश आले आहे.गेल्या दोन महिन्यात पोटनिवणुकीचा बंदोबस्त आणि लॉकडाऊनच्या बंदोबस्ताची अतिरिक जबाबदारी पार पाडत असतानाच अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलीस खात्याने केलेल्या आहेत.मात्र याच वेळी गौण खनिज रक्षणाची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याकडून अगदी तुरळक कारवाया होताना दिसून येतात.ज्या गावात पोलिसांकडून कारवाई होते तेथील महसूलच्या तलाठी,मंडल अधिकारी यांची जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित असते.मात्र याबाबत कुठलेही कठोर पावले उचलले जात नसून बहुतांश तलाठी आणि मंडल अधिकारी हे कर्तव्याच्या ठिकाणी निवासी राहणे बंधनकारक असताना देखील या नियमाचे पालन करीत नाहीत अशी चर्चा सातत्याने होत आली आहे.तर कोतवाल आणि पोलीस पाटील हे गावातच असल्यामुळे अवैध वाळू होत असल्यास त्यांच्याकडून तातडीने माहिती मिळण्याची अपेक्षा महसूल व पोलीस खात्यास असते.
पंढरपुर तालुक्यातील तावशी येथील कोतवाल आणि पोलीस पाटील यांनी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी दक्षता बाळगत दिनांक ८ जून रोजी वाळु चोरी होवू नये या अनुशंगाने गावात पाहणीसाठी गावचे पोलीस पाटील कविराज आसबे हे गावातील खंडोबा मंदिराशेजारी आले असता, सुधाकर माणिक हिल्लाळ,वय 35 वर्शे, व्यवसाय कोतवाल मौजे तावशी, रा.तावशी ता.पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दि. 08/06/2021 रोजी रात्री 09/15 वा.चे सुमारास एक अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी छोटा हत्ती येत असताना दिसले. संशय आल्याने थांबवून पाठीमागील हौदयात जावून पाहणी केली असता त्यात वाळु दिसून आली. त्यांचेकडे वाळुचे रयल्टी, परवानाबाबत चैकशी केली असता त्यांनी वाळुच्या वाहतुकीचा परवाना, रयल्टी काही एक नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस फोन लावून घडला प्रकार कळविलेनंतर पोहेक1740 काळे, पोना 1608 माळी, चालक पोना 42 भोसले असे सर्वजण आल्यानंतर त्यांना सविस्तर घडला प्रकार सांगून सदरचे वाळुचे वाहन आरटीओ नं. MH 21 X 3282 व त्याचे पाठीमागील हौदयात शासनाची चोरीची रु. 3000/- किं.ची अर्धा ब्रास वाळु-रु. 2,53,000/- हे कारवाईसाठी पोलीस ठाणेस आणून लावण्यात आले आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाचा अशोक लेलंड कंपनीचा चारचाकी छोटा हत्ती वाहन व वाळु हे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणेस आणून लावले आहे. या प्रकरणी चारचाकी छोटा हत्ती वाहन नं. MH 21 X 3282 मध्ये अवैधरित्या, चोरुन, बेकायदेशीरपणे, संगनमत होवून उपसा करुन वाळु वाहतूक करीत असताना मिळाल्याने 1) नवनाथ अशोक पवार रा.षिरसी ता.मंगळवेढा जि.सोलापूर 2) शुभम केराप्पा नागणे रा.बायपास रोड मंगळवेढा ता.मंगळवेढा यांचेविरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.