समाजावर व देशावर ज्या-ज्यावेळी संकट आलं, त्या-त्यावेळी याच समाजातून मदत करणाऱ्या व्यक्ती पुढे आलेल्या आहेत, त्यातही अशा संकट प्रसंगीच नव्हे तर प्रत्येक सामाजिक कार्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे योगदान आजपर्यंत मोलाचे ठरत आले आहे. असे प्रतिपादन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले. ते पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीने देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या प्रदान समारंभात बोलत होते.
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी जमा केलेल्या सहा लाख अठरा हजार एवढ्या रकमेतून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मल्टी पॅरा मॉनिटर व कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे खरेदी करून आज आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते पंचायत समितीच्या आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती अर्चनाताई व्हरगर, उपसभापती राजश्रीताई भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, रामदास ढोणे, तानाजीराव वाघमोडे, बाळासाहेब देशमुख, नानासाहेब गोसावी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ अवताडे, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, नगरसेवक लक्ष्मण पापरकर, अर्बन बँकेचे संचालक रा. पां. कटेकर, शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, संजय व्हरगर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना महामारीच्या काळात बळी पडलेल्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष संजय हेगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष सुनील कोरे यांनी प्रास्ताविकातून या कार्यामागील हेतू सांगून तालुक्यातील शिक्षक बांधवांनी समन्वय समितीच्या आवाहानास प्रतिसाद देत 6 लाख 18 हजार रुपये एवढा मदतनिधी दिला.या यातून कोरोना पाॕझिटिव पेशंटसाठी डाॕ बोधले सरांचे मार्गदर्शनाने उपयोगी वैद्यकिय साहित्य आणले आहे असे सांगून.तालुक्यातील 9 शिक्षक संघटनेनी एकत्र येवून हा समाज उपयोगी व सामाजीक ऋण व्यक्त करणारे हे कार्य केले आहे असे मत व्यक्त केले .याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी शिक्षक संघटनेचे हे सामाजीक कार्य कौतुकास्पद आहे.भविष्यात हे साहित्य अनेकांनांचे वाचवू शकेल असे मत व्यक्त केले.शिक्षक संघ संभाजीराव गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतीराम बोंगे यांनी मनोगत व्यक्त करताना या महामारीत आपचे कर्तव्य म्हणून हे कार्य केले असून भविष्यात अशाच प्रकारचे सहकार्य शिक्षक संघटनेकडून केले जाईल असा शब्द दिला. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे यांनी शेवटी आभार मानले तर शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन लादे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी डॉ बिभीषण रणदिवे, श्री लिगाडे, आदर्श शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब मिसाळ जिल्हा पतसंस्थेचे संचालक नागनाथ क्षिरसागर पती-पत्नी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विजय लोंढे पदवीधर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस व शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे शिक्षक प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुभाष भोसले मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडूरंग जाधव शिक्षक समितीचे उपाध्यक्ष सुनिल अडगळे आदर्श शिक्षक समितीचे महिला जिल्हाध्यक्षा सौ भाग्यश्री सातपुते शिक्षक संघाचे महिला नेत्या महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ राणी होनमाने (लेंगरे )शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ सुरेखा इंगळे चेअरमन राजाभाऊ खपाले महाराष्ट्र राज्य जूनी हक्क पेंशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज मुलाणी.शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आण्णासाहेब रायजादे.मा.चेअरमन अशोक कांबळे. अविनाश करकमकर संचालक संतोष कांबळे सरचिटणीस शिक्षक संघ प्रशांत ननवरे आदर्श शिक्षक समितीचे प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर घोडके कोषाध्यक्ष राहूल जाधव शिक्षक भारतीचे संघटक राजेश भुईटे सिद्धेश्वर लेंगरे आण्णा राजमाने नामदेव वनवे केंद्रप्रमुख ब्रम्हदेव घाडगे पांडूरंग धुमाळ इतर शिक्षक बांधव उपस्थित होते.