गुन्हे विश्व

सावळेश्वर येथे एकाच क्रमांकाचे दोन वाहने आली महामार्ग पोलिसांच्या समोर 

आरटीओ पासिंग,टॅक्स अथवा इन्शुरन्सची मुदत संपलेले अथवा कालबाह्य झालेले अनेक वाहने डुप्लिकेट नंबरप्लेट वापरून व खोटी कागदपत्रे जवळ बाळगून रस्त्यावर धावत असल्याचा प्रकार अनेक वेळा उघड झाला आहे.जागोगाजी असलेल्या चेकपोस्टवर वाहनांची कागदपत्रे तपासून पहिली जातात मात्र कागदपत्रावर नमूद केलेला इंजन नंबर चेसिस नंबर तपासून पाहण्याचे प्रमाण नगण्य आहे.आणि याचाच काही वाहन मालक चालक गैरफायदा उठवत असल्याचे दिसून येते.मात्र सोलापूर जिल्ह्यातील सावळेशवर येथे मोठी गडबड झाली आणि एकाच क्रमांकाची दोन वाहने नेमकी महामार्ग पोलिसांच्या समोर आली.संशय बळावल्याने केलेल्या तपासणीत दोन्ही गाडीचे एकसारखे नंबर ( एम एच 45 ए एफ 5085) दिसले. अधिक चौकशी केली असता गोकुळ अर्जुन सांळुखे,रा.फुटजवळगाव,ता.माढा,जि.सोलापूर व उध्दव उत्तम सांळुखे,रा.फुटजवळगाव,ता.माढा जि.सोलापूर , असे एकाच गावातले राहणारे दोघा चुलत भावाच्या मालकीची हि वाहने असल्याचे स्पष्ट झाले.
या बाबत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर उध्दव उत्तम सांळुखे, रा. फुटजवळगाव, ता.माढा जि.सोलापूर यांचे पिकअप गाडी क्रमांक एम एच 45 ए एफ 5085 चे ईंजीन व नंबर प्लेट हे कागदोपत्री सत्य असल्याचे आढळून आले तर गोकुळ अर्जुन सांळुखे , रा. फुटजवळगाव, ता.माढा,जि.सोलापूर याच्या पिकअप वाहनाचा खरा नंबर एम एच 45 टी 3524 असल्याचे आढळून आले.या प्रकरणी दोन्ही वाहन मालकांवर भादंवि ३४,४२० नुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *