गुन्हे विश्व

पंढरपूरकडून येणाऱ्या पिकअपवर महूद येथे सांगोला पोलिसांची कारवाई

पंढरपुरकडून रात्री रविवार दिनांक ६ जून रोजी १० चे सुमारास मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची वाहतूक करणारे पिकअप वाहन महुदकडे येणार असल्याची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत एमएच 12 जेएफ 1444 या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून 63,61,900/-रू किमंतीचा गांजा वाहतूक केला जात असल्याचे आढळून आले आहे.
या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एन बी यमगर नेमणुक सांगोला पोलीस ठाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 06/06/2021 रोजी 22/00 वा सुमारास कुमार जाधव रा. महुद बु।। ता. सांगोला हा एमएच 12 जेएफ 1444 कमांकाच्या पांढरे रंगाच्या, समोरील काचेवर मायाक्का असले लिहीलेल्या महींद्रा पिकअपमधुन गांजाची पोती घेवुन पंढरपुरकडुन महुद बु।। येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचे सांगितले.पोनि जगताप व पोसई नाळे, एएसआय ढवणे, पोहेकाँ. पवार बनं. 1640, पोना. मोहोळकर बनं. 1682, पोकाँ. पाटील बनं. 1425, पोकाँ. चोरमले बनं. 2206 असा पोलीस स्टाफ, दोन पंच, तोलार यांच्यासह पंढरपुर ते महुद रोडवर पोलीस स्टाँफची दोन पथके तयार करून एक पथक जय भवानी हाँटेलचे पुर्वेस पंढरपुर रोडवर दुसरे पथक जय तुळजाभवानी हाँटेलचे समोर थांबवले.
रात्री कारवाई साठी थांबलेल्या पथकाने थांबण्याचा इशारा केल्याने पांढ-या रंगाचे पिकअप हाँटेल जयभवानीचे समोर थांबले.सदर वाहनाचा नंबर पाहीला असता एम एच 12 जे एफ 1444 समोरील काचेवर मायाक्का प्रसन्न असे लिहलेले.व चालकाचे नाव विचारले असता कुमार जाधव रा महुद ब्रू असे असल्याचे सांगीतले.तसेच सदर पिकअप सोमनाथ सुरेश कांबळे रा.महुद ब्रु यांचे मालकीचे असल्याचे माहीती दिली. सदर पिकअप मध्ये मोकळी करेट भरले आहेत.सदरचे सर्व मोकळे करेट वाहनातुन बाहेर काढले असता आतमध्ये निळे रंगाची ताडपत्री झाकुन पांढरे रंगाची 11 गच्च भरेलेली पोती CP Broiler Finisher 511 H असे लिहलेली पोती एकावर एक ठेवलेली आढळुन आली .सदर पोत्या मध्ये काय आहे.असे विचारले असता कुमार जाधव यांनी त्यांमध्ये गांजा असल्याचे माहीती पंचा समक्ष दिली.सदरची 11 पोती ताडपद्री उघडुन पाहता.उग्रदर्प वास येवु लागला.सदरची 11 पोती पिकअप मधुन खाली काढली.69,62,400/रूयेणे प्रमाणे एकुण 11 पोती ओलसर हिरवट रंगाचा व बियासह असलेला गांजा एकुण 318.095 कि.ग्र वजन व 63,61,900रू किमंतीचा मिळुन आल्याने त्या प्रत्येक पोत्यातुन 25,25 ग्रमचे दोन सप्लस दोन वेगवेगळया प्लिस्टीक पिशवीत काढुन घेवुन प्रत्येक पोत्याला व दोन्ही सम्पला वेगवेगळी अशी आमचे व पंचाचे सहयाची कागदी लेबल लावण्यात आले.
या प्रकरणी 1) कुमार पांडुंरग जाधव रा महुद ब्रू ता सांगोला हा इसम नामे 2) सोमनाथ सुरेश कांबळे रा.महुद ब्रु ता सांगोला यांच्या विरोधात भादंवि ३४ व अमली पदार्थ कायदा (१९८५) २० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *