ताज्याघडामोडी

नेहतराव बंधूनी सोडला मोहिते-पाटलांचा पक्ष

पंढरपूर नगर पालिकेचे मा.नगरसेवक संतोष नेहतराव आणि पंढरपूर नगर पालिका बांधकाम समितीचे सभापती सुरेश नेहतराव यांची पंढरपूर शहराच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील सर्मथक अशी ओळख आहे.गेल्या दहा-बारा  वर्षाची त्यांची राजकीय वाटचाल पाहता अकलूजवासी विजयसिह मोहिते पाटील गट ज्या पक्षात त्याच पक्षाचा पंचा नेहतराव बंधूंच्या गळ्यात हे चित्र पाहावयास मिळाले आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सूत्रेच नेहतराव बंधूंच्या हॉटेल लक्ष्मी पॅलेस येथून हालत होती.तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी स्व.आ.भारत भालके यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि नेहातराव बंधुनी स्व.भालकेंचा प्रचार केला.२०१९ मध्ये विजयसिह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली आणि नेहतराव बंधुनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भव्य रॅली काढत भाजपचा पंचा गळ्यात घातला.मात्र या विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच नेहतराव बंधू हे मोहिते पाटील यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत गेल्याने दोन्ही तालुक्यातील मोहिते-पाटील सर्मथक अवाक झाले आहेत.                               

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ ना.अजित पवार हे कालपासून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या भेटीवर असून प्रचार सभा करत असतानाच भगिरथ भालकेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे यासाठी विविध स्थानिक नेतेमंडळीच्या भेटी घेत,संपर्क साधत सहकार्य मागत आहेत.काल त्यांनी नागेश भोसले आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या घरी भेट देवून चर्चा केली तर आज भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांनी सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.मंगळवेढा तालुक्यातील प्रचार सभेत नेहतराव बंधूनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मात्र या निवडणुकीत मोहिते – पाटील सर्मथकांची भूमिका वेगळी आहे कि काय ? अशी चर्चा होत असतानाच दोन्ही तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांत मात्र खळबळ उडाली असल्याचे दिसून येते.                             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *