ताज्याघडामोडी

समाजावर अन्याय होत असेल तर टोकाची भूमिका घेणार !

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून वाद पेटत आहे. अशात शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरुन संभाजीराजे भोसले यांनी इशारा देत मराठा आरक्षणावर पुढची दिशा सांगितली. शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मराठा समाज वाईट परिस्थितीतून जात आहे. समाजावर अन्याय होत असेल तर टोकाची भूमिका घेणार. आतापर्यंत फक्त सहन केलं, पण आता आम्ही संयम बाजूला ठेवला आहे. आता आंदोलन हे निश्चित आहे. मराठा समाजाचा पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीपासून निघेल.16 जूनपासून कोल्हापुरात आंदोलनाची सुरूवात करणार असल्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला.

‘मी बहुजन समाजासाठी आंदोलनं केली. मराठा समाजासाठी लढायचं नाही का? कोणावरही आरोप-प्रत्यारोप करण्यात मला रस नाही, मझा लढा 70 टक्के गरीब समाजासाठी आहे. मी सरकारला तीन पर्याय दिले आहेत. महाविकास सरकारला हात जोडून विनंती केली. समाजासाठी आता संयम बाळणार नाही. मराठा समाजातील मानस खुळी नाहीत, कोण चुकत यांच्याशी आमचं काहीही देणंघेणं नाही.’ असं देखील संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे पुढे म्हणाले, ‘आम्हाला आरक्षण कस देणार ते सांगा. यापुढे संभाजीराजे संयमी राहणार नाहीत, मी आक्रमक होणार. लोकांना गृहीत धरू नका..लोकांना रस्त्यावर उतरवू नका. पुढाऱ्यांना विनंती आहे, जे हातात आहे ते सांगा. आंदोलन निश्चित आहे, पण रस्त्यावर येवू नका. पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीपासून निघेल. त्यानंतर संपुर्ण राज्यातील जिल्ह्यात आंदोलन करणार. पुण्यापासून ते मुंबईपर्यंत मराठा समाज लाँग मार्च काढणार असा इशारा देखील संभाजीराजेंनी रायगडावरून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *