ताज्याघडामोडी

सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल,यंदा तरी परवानगी द्या !

करोना बाधितांची संख्या घटत आहेत. बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत; मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दल निर्णय झालेला नाही. वारकऱ्यांनी सरकारकडे यंदा किमान पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असे म्हणत वारकरी संप्रदायाने सरकारला तीन पर्याय दिले आहेत. सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल; मात्र सरकारने पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी अभय टिळक यांनी केली आहे.

‘देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्‍वर, मुक्‍ताईनगर, सासवड, पिंपळनेर या देवसंस्थानांच्या वारी सोहळ्यासाठी सरकारने प्रत्येकी 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. करोना स्थिती वाढली, तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढेच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत,’ अशी माहिती अभय टिळक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *