कोरोनाच्या पार्शवभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनाचा अवलंब केला जात आहे.नागिरकांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंढेवाडी येथील ग्राम पंचायत सदस्य,युवा उद्योजक अभिमान शिवाजी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत संपूर्ण गावात मास्कचे आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले तर शहरातील विविध ठिकाणी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली.याच बरोबर गोपाळपूर पोलीस चेकपोस्ट,अहिल्यादेवी चौक पोलीस चेकपोस्ट,ग्रामीण पोलीस ठाणे आदी ठिकाणीही मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर,नायब तहसीलदार श्री कोळी,भालचंद्र मोरे,नगरसेवक डी.राज सर्वगोड,सरपंच भास्कर मोरे, मा.सरपंच सिद्धेश्वर मोरे,युवा नेते मधुकर मोरे,नागेश मोरे,अभयसिह मोरे,पोलीस पाटील शरद मोरे,जितेंद्र वजीरनकर,सुनील जाधव,सोसायटी चेअरमन माणिक मोरे,जिल्हाध्यक्ष शरद सर्वगोड,धर्मा नवले,गोरख मोरे,पांडुरंग मोरे,कल्याण घाडगे,अक्षय मोरे,राजाभाऊ राऊत,संजय मोरे,प्रशांत मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
