

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांच्या आईच्या आई अर्थात आजी श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने,वय वर्ष १०५ (भिम बहादुर सरकार) मांगुर ता.चिकोडी कर्नाटक यांना १५ दिवसापूर्वी तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव आला.त्यांच्यावर कोल्हापूरातील ॲपेक्स हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले.उपचारांना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम प्रतिसाद दिल्याने त्यातून त्या ठणठणीत झाल्या आहेत. ४ मुली, ३ मुले,१६ नातवंडे,व २१ परतवंडे असा असा मोठा परिवार आहे.या परिवारापैकी अनेकजण राजकीय,प्रशासकीय पदांवरही कार्यरत आहेत.
या बाबत आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भावना प्रकट केली असून, आजही आजींची स्मरणशक्ती आणि प्रकृती ठणठणीत आहे.जुन्या काळातील प्लेगसह इतर साथ रोगाबाबतच्या आठवणी त्या स्पष्टपणे सांगतात.कुटुंबातील सर्वांसाठीच त्या मार्गदर्शक आधारवड आहेत.दररोज वृत्तपत्रांचे वाचन चालण्याचा व्यायाम अखंडपणे असतोच.कोरोनाला न घाबरता वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्यावर आपण मात करू शकतो.असा संदेश त्यांनी आपल्या सर्वाना दिला आहे असे आमदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी यात नमूद केले आहे.