राज्यातील कोरोना बाधितांचा आलेख खाली येऊ लागताच गेल्या सुमारे ५० दिवसापासून बंद असलेले व्यवसाय सुरळीत सुरु व्हावेत अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांकडून होताना दिसून येत असुन राज्य शासनाने १जून पासून अनेक नियम शिथिल केले असले आहेत.राज्यात पुणे मुबंईत अत्यावश्य्क सेवा वगळता इतर दुकानेही सुरु होऊ लागली असताना सोलापुरात मात्र दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जे नियम ग्रामीण भागाला लागू केले आहेत त्याच नियमाचा आधार घेऊन सोलापुरात देखील महापालिका आयुक्तांनी इतर दुकाने उघडण्यास परवानगी नाकारली आहे.सोलापूर शहराची लोकसंख्य १० लाखापेक्षा कमी आहे असे या व्यापाऱ्याचे म्हणणे असून तरी देखील आम्हास दुकाने उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे असा संताप व्यक्त करीत माजी आमदार दिलीप माने यांच्या सह अनेक दुकानदारांनी सोलापूर महापालिकेच्या दारात ठिय्या मांडला.
