राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत पण विलीनीकरण केल्यास सर्व प्रश्न मार्गी लागतील एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळत आहे आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे ती यापूर्वीच करण्याची गरज होती तसेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचार्याचा दर्जा द्यावा हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल या आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटना सर्व शेतकरी बांधवांचा जाहीर पाठिंबा आहे….
यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर संपर्कप्रमुख तानाजी पाटील, माढा तालुकाअध्यक्ष राजेंद्र डोके, बळीराजा शेतकरी संघटना कामगार संघटना जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोंढे, तालुका उपाध्यक्ष पंडित पाटील, सुभाष मारकड, दादा यादव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.