ताज्याघडामोडी

सह.शि.वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर

स्व.वसंतदादा काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन 

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.29/01/2023 रोजी पटवर्धन कुरोली येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणरावजी काळे यांच्या उपस्थितीत शिबीराचे उदघाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी 340 लोकांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

          यावेळी बोलताना काळे म्हणाले की, वसंतदादा काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने राबवित असतो.परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच तालुक्यात पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, भाळवणी कारखाना साईट या ठिकाणी मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबीराचा सर्वांनी घ्यावा असे आवाहन उदघाटन प्रसंगी काळे यांनी केले.

          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे श्री विठठल साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तम काका नाईकनवरे, मोहनदादा उपासे, नंदकुमार दादा पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे,यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे माजी संचालक उपासे, नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे, हनुमंत मोरे, नारायण शिंदे  पांडुरंग नाईकनवरे, सुग्रीव कोळी, मंगेश उपासे, निलेश काळे, वसंतदादा काळे मेडिकल फाऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे, डॉ.संदेश पडवळ, डॉ अजित जाधव,डॉ सुजीत जाधव,डॉ महेश कोडलकर डॉ.अनिल काळे डॉ.सौ जयश्री शिनगारे,  डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ विजय मूढे, आण्णासाहेब डुबल ,सद्दाम मणेरी, श्री इंगोले, उपस्थित होते.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *