ताज्याघडामोडी

कोविनवर उपलब्ध झाला स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय

नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात मोठे हत्यार असल्यामुळे जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग भारतात देखील वाढण्यात आला असून आता १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

पण गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. तर लसींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यातच आता सरकारने कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लसीनंतर रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही या तिसऱ्या लसीला परवानगी दिली आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लसींच्या दोन खेप पोहोचल्या असून रशियन बनावटीची पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजच्या सदस्याने घेतली. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवर दिसू लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

कोविन अ‍ॅपवरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. स्पुटनिक व्ही लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडीत रुग्णालयांची यादी समोर दिसेल. स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे एवढी असेल असे कंपनीने स्पष्ट केल्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *