Uncategorized

पंढरपुर विभागात विशेष पुरहानी निधीतून होणार रस्ता व सेतुपूल दुरुस्तीची कामे

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. विशेष पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढपुरच्या माध्यमातून जवळपास ५ कोटी ५२ लाख रुपये खर्चून रस्ते व सेतूपुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.या कामबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपुर यांच्या वतीने निविदा आमंत्रित करण्यात आल्या असून पुढील सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे.

गतवर्षी भीमा नदीस आलेला महापूर व ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना जोडणारे अनेक रस्ते व सेतुपूल याना धोका पोहचला होता,सदर रस्त्याची व सेतूपुलाची तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी मागणी होताना दिसून येत होती.आता प्राप्त झालेल्या निधीतून १) कौठाळी-खेडभाळवणी-वाडीकुरोली-शेळवे प.जि.मार्ग १७० मधील किमी ९/७०० ते १० मधील रस्त्याची व सेतूपुलाची दुरुस्ती साठी अंदाजे १ कोटी ५ लाख खर्च अपेक्षित आहे.२) पंढरपूर -देगाव-टाकळी सिकंदर-कुरुल रस्ता रा.मार्ग ३९० या मार्गावरील विविध ठिकाणी रस्ता व पुलाची दुरुस्ती करणे यासाठी १ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.३) मंगळवेढा-खोमनाळ-सलगर रस्ता सेतूपुलाची दुरुस्ती करणे यासाठी १ कोटी ४४ लाख खर्च अपेक्षित आहे. ४) धर्मगाव-मल्लेवाडी-गुंजेगाव रस्ता येथील सेतूपुलाची दुरुस्ती करणे यासाठी १ कोटी ७४ लाख खर्च अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *