ताज्याघडामोडी

नवऱ्यानं पेट्रोल टाकून भररस्त्यात बायकोला पेटवलं, ऑटो चालक ठरला देवदूत

देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबईतील मुस्लिम रिक्षा चालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. मुंबईतील सुमन नगर अण्णाभाऊ साठे ब्रिजच्या खाली एक महिला पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदत याचना करत होती. रस्त्याने ये-जा करणाऱ्या कोणत्याही वाहनांनी थांबून मदतीची भावना दाखवली नाही.

यादरम्यान एक ऑटो चालकाने आपले भाडे आणि रोजच्या कमाईचा वेळ सोडून सदरचे पेटलेल्या महिलेचं दृश्य पाहून तो स्वतःचे वाहन थांबवून त्याच्या ऑटोतील पाण्याच्या बॉटलने पेट घेतलेल्या महिलेच्या अंगावर ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात दाखल केलं. सदर महिला सायन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. देवदूत ऑटो चालकाच्या मदतीमुळे ती केवळ दहा टक्के भाजलेली असल्याची माहिती सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

रिक्षा चालक मोहम्मद इस्माईल शेख त्यांच्या कृतीने अजून देखील समाजात मानवता जिवंत असल्याचे दर्शन झाले. सदर महिला ही सुमन नगर, चुनाभट्टी येथे राहणारी असून वडाळा रोड येथे कामाला जाण्यासाठी बुधवारी दि. १४ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अण्णाभाऊ साठे ब्रिज जवळील बस स्टॉपवर आली असता तिच्या पतीने अचानकपणे येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून लाईटरने आग लावली होती.

सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानव यंत्राच्या गतीने धावत असताना पोलिसांच्या आवाहनानंतर मदत करणाऱ्यांची संख्या तोकडी दिसत असते. मोहम्मद इस्माईल शेख याच्या धाडसाचे आणि मानवतेचे कौतुक करून नेहरू नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ सौदागर यांनी रिक्षा चालक मोहम्मद इस्माईल शेख याचा सत्कार केला आणि यापुढेही समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी जनतेनं पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *