ताज्याघडामोडी

कामावरून यायला झाला उशिरा, बायको कडाकडा भांडली, नवऱ्याने रुम बंद केली आणि घेतलं पेटवून

पत्नी उशिरा आल्याने झालेल्या वादातून एका पतीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मध्य प्रदेशच्या राजधानीत, भोपाळमध्ये घडली आहे. आधी पती-पत्नीचा वाद झाला आणि नंतर पतीने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने फ्लॅट आतून बंद करून घेऊन स्वतःला पेटवून घेतलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली आणि अर्धवट जळलेल्या स्थितीतला मृतदेह बाहेर काढला.

प्रकरण भोपाळमधल्या अवधपुरी भागात घडलं आहे. तिथल्या नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे एका एनजीओचे स्टेट प्रोग्राम मॅनेजर प्रदीप नायर (46) यांनी आपल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी 14 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदीप यांचं दुसरं लग्न झालं होतं. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. निहारिका (27) असं त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे. ती एका एनजीओमध्ये काम करते. अवधपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर प्रदीप नायर यांनी गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला त्यांच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या निहारिकाशी दुसरं लग्न केलं होतं. प्रदीप आणि निहारिका दोघेही वेगवेगळ्या एनजीओसाठी काम करत होते.

“प्रदीप रायपूरमध्ये, तर निहारिका भोपाळमधल्या एका एनजीओमध्ये काम करत होती. प्रदीप शनिवारी भोपाळला आले होते. पत्नी रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांच्यात मोठा वाद झाला आणि त्यांनी निहारिकाला मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी निहारिका फ्लॅटमधून पळून गेल्यावर प्रदीप यांनी फ्लॅटला आतून कुलूप लावून स्वत:ला पेटवून घेतलं. फ्लॅटमधून आग व धुराचे लोट शेजाऱ्यांना दिसताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलाला कळवलं. त्यांनी आग विझवली.”

फ्लॅटच्या एका कोपऱ्यातून प्रदीप यांचा अर्धवट जळलेल्या स्थितीतला मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवला असून, कुटुंबीय आल्यानंतर पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रदीप यांची पत्नी निहारिकाचा जबाब नोंदवला असून तिची मेडिकल चाचणीही केली आहे. निहारिकाला मारहाण करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. एनजीओच्या कामामुळे घरी उशिरा पोहोचल्याचं निहारिकाने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *