Uncategorized

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी हॉटेल चालकांना केवळ पार्सल सुविधेची परवानगी दिली होती तर सलून दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.जिल्हाअधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यालयीन पत्र जावक क्र 2021/मशा/कार्या-4/नैआ/जिनिक/प्रक्र24/आर आर -901 दिनांक 04/05/2021 आदेश निर्गमित केले असुन ते विविध वृत्तपञामध्ये व समाजमाध्यमाद्वारे जाहीर केलेले आहेत त्यात जीवनावश्यक वस्तुचे दुकान यांना कालमर्यादा दिलेली होती.शुक्रवार दिनांक ७ रोजी पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे,पो.कॉ.स्वप्नील पवार,पो.कॉ.वगरे हे शहरात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसाठी फेरफटका मारत असताना त्यांना नवीपेठ मारुती मंदिर परिसरातील सलून व्यवसायिक रोहित संतोष खंडागळे हे दुकानात ग्राहकांना प्रवेश देऊन व्यवसाय करताना आढळून आले तर व हॉटेल व्यवसायिक गणेश सावळसकर हे हॉटेल चालक फक्त पार्सल सेवा देण्यास परवानगी असताना सदर हाँटेल मध्ये 5 ते 6 इसम सोशल डिस्टसिंगचे पालन न करता ,सँनिटायझर व मास्कचा वापर न करता वडापाव खरेदी साठी बसल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणातील दोन्ही व्यवसायिकांची कृती हि कोरोना विषाणू अनूशंगाने हयगयीपणाची ,निष्काळजीपणाची व विषाणू संसर्ग पसरविणारी असल्यानेत्याचे विरूध्द भादवि क.188,269प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *