ताज्याघडामोडी

1 एप्रिल पासून जुन्या गाड्या बंद होणार

मुंबई : केंद्र सरकारने सरकारी विभागांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आता कोणत्याही सरकारी कार्यालयातील अधिकारी त्यांच्या 15 वर्षांच्या सरकारी वाहनांची नोंदणी 1 एप्रिल २०२२ पासून नूतनीकरण  करू शकणार नाहीत.अधिसूचनेनुसार, ‘हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर हा नियम सर्व सरकारी वाहने- केंद्र आणि राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्था यांना लागू होईल, असे म्हटले आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ट्विट करत या प्रस्तावाची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *