ताज्याघडामोडी

ठरलं! शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा; पहिली सभा या मंत्र्यांच्या मतदारसंघात

अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजून आपण मैदानात असल्याचे संकेत दिले. पवार यांनी आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे कराडमध्ये कार्यक्रमासाठी आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची आहेत. या दौऱ्याची सुरुवात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मतदारसंघातून करण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, हा पक्षाच्या धोरणाचा निर्णय नाही, ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक आहेत, ते बसतील आणि निर्णय घेतली. त्यामुळे बाकीचे नेते आहेत. जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय घेतील. मी पक्षप्रमुख म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक केली आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पक्षासाठी जी पावलं टाकली पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यामुळे ज्यांनी जबाबदारी टाकली त्यांचा आता विश्वास राहिला नाही. त्यासाठी उचित कारवाई करावी, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागले. पक्षाच्या चौकटीबाहेर गेले, चौकट घेऊन गेले, त्या प्रत्येकांचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा आणि प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार असून दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवनेरीपासून करणार असून शेवट रायगडवर करणार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *