ताज्याघडामोडी

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी ‘येलो अ‍ॅलर्ट’

उष्म्याने अचानक कहर केल्यानंतर राज्यात आता वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांसाठी म्हणजे 10 मार्चपर्यंत ‘येलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

त्यानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना वादळी वारे व गारपिटीसह पावसाचा तडाखा बसणार आहे. तसेच गुजरात व मध्य प्रदेशलाही अॅलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्रात केरळ किनाऱयापासून कोकण किनाऱयापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेचे वारे एकत्र वाहत आहेत. या हवामान बदलामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहतील. उत्तर मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिह्यांत तर मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना आणि बीड या जिह्यांत गारपिटीची शक्यता आहे. यात शेतपिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. बुधवारी मराठवाडय़ात वादळी वारे, गारपिटीसह पाऊस कोसळेल, असे कुलाबा वेधशाळेतील अधिकाऱयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *