शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि तरतुदी याचा विचार न करता व सद्सद्विवेक बुद्धीचा वापर न केल्याचे दिसून येत असल्याने मुख्याध्यापकाची शिक्षा रद्द करण्यात आली.
