ताज्याघडामोडी

उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर

उपमुख्यमंत्री कितीही वेळा येऊ दे,जनता आमदार समाधान आवताडेंनाच करणार : प्रवीण दरेकर
पवार कुटुंबीय निवडणुकीसाठी नाही आले तर कारखान्यावर त्यांचा डोळा आहे, त्यांचे नानांच्या घराकडे लक्ष नाही. संधी एकदा येते, त्याच सोनं करून घ्या, मंगळवेढ्याला नेतृत्वाची संधी मिळाली आहे, पंढरीच्या पांडुरंगाने आशीर्वाद दिलेत, किती वेळा ही उपमुख्यमंत्री येवो जनता आमदार समाधान आवताडे यांनाच करणार असा एल्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या मंगळवेढा तालुक्यात ठिकठिकाणी  सभा झाल्या या सभांना आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, सचिन शिवशरण, सचिन घुले, राजेंद्र पोतदार, दौलत मासाळ, पांडुरंग मासाळ, बापू मेटकरी, रजाक मुजावर माजी झेडपी सदस्य शिवाजी नागणे, सुरेश भाकरे, चंद्रकांत जाधव, दिगम्बर भाकरे, भारत शिंदे, दीपक चंदनशिवे, सोमनाथ भोसले, यांच्यासह भाजप व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगळवेढा पंढरपूरचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे, आता चुकलात तर मंगळवेढ्याची जनता माफ करणार नाही, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे चांगले काम झाले, अनेक प्रकल्प आणले, राज्याचं  चित्र बदललं, रस्ते झाले राज्य पुढं जात होतं,मात्र त्या विकासाला महावसुली सरकारमुळे खीळ लागली,  आता काय तर कोरोना, नाचता येईना अंगण वाकडं, करता येत नाही कोरोना, काही झाले की कोरोना, महाराष्ट्राने अनेक संकट पाहिली, सक्षमपणे तोंड दिलंय,  मुख्यमंत्री घाबरले आहेत, हतबल झालेत कॅप्टन जर असा असेल तर राज्य पुढे कसे जाणार? संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघात लागले आहे, जनता काय करते हे महाराष्ट्र पाहणार आहे, आता मोठी लोक येत आहेत, हे पुढारी, प्रस्थापित आहेत आमदारांचा मुलगा आमदार होतो, मंत्र्यांचा मुलगा मंत्री,  भाजपात असे नाही, आम्ही सर्वसामान्य लोक आहेत,  या निवडणुकीत प्रस्थापितांची मस्ती उतरायची आहे, भारत नाना आमचे मित्र होते, नाना कारखान्यासाठी आले होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई जिल्हा बँक कडून नानांना मदत केली असे दरेकर म्हणाले.
राज्यामध्ये कुणाच्याही चेहर्‍यावर आनंद नाही. राज्याचे सरकार बिल्डर व दारू विक्रेत्याचे आहे. बिल्डरांना सवलत द्यायला पाच हजार कोटी रुपये आहेत. मात्र, शेतकऱ्यांना सवलत द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्याची विजेचे कनेक्शन तोडले जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव पाणी येण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून निधी आणण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, त्यासाठी तुम्हाला इथला आमदार भाजपचा निवडून द्यावा लागेल. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील पाण्याचा प्रश्नदेखील केंद्र सरकारच्या मदतीतून मार्गी लागेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *