ताज्याघडामोडी

भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका  : सदाभाऊ खोत समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

भूल थापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही त्याला मत देऊन, डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका  : सदाभाऊ खोत
समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
  मंगळवेढा- पंढरपूरच्या पांडुरंगाने यावेळी मंगळवेढ्याच्या दामाजीला साथ दिली आहे, प्रशांत मालकांचा पांडुरंग परिवार या निवडणुकीत जीवाचे रान करत आहे, त्यामुळे समाधान आवताडे यांना आमदार करण्याची ही शेवटची संधी आहे, मंगळवेढेकरांनो गटतट विसरा, कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, जो निवडून येणार नाही, त्याला मत देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लोकशाहीचा अधिकार वाया घालवू नका, मंगळवेढ्याची माती अनेक वर्षांपासून अंगावर विजयाचा गुलाल घेण्यासाठी उत्सुक आहे ती संधी सोडू नका असे आवाहन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात प्रचार फेरी काढण्यात आली, प्रारंभी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाधान आवताडे यांनी  दामाजीचे संचालक सचिन शिवशरण यांच्यासोबत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शनिवार पेठेतून प्रचार रॅलीला सुरुवात झाली, पुढे खंडोबा गल्ली, मारवाडी गल्ली, जगदाळे गल्ली, किल्ला भाग, माने गल्ली, कोंडूभैरी गल्ली, या भागातून निघालेल्या पदयात्रेत युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता.
उमेदवार आवताडे म्हणाले, मंगळवेढ्यातील सर्वांनी आई वडिलांप्रमाणे प्रेम दिलंय, तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे म्हणत बळ दिले, ते ऋण कधीच फिटणार नाही, माझी राजकारणात यायची इच्छा नव्हती, मी पडद्यामागचा कलाकार होतो, पण या तालुक्यातील राजकिय शक्ती, संस्था यांच्या कडून जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही, आपल्या शहराचा, तालुक्याचा विकास करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता, म्हणून राजकारणात प्रवेश केला, ही माती आपली आहे, या मातीत जन्म झाला, इथं वाढलो त्या मातीचे ऋण फेडण्याची वेळ आहे, शहराचा, तालुक्याचा विकास करू, संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवेढा विकासाच मॉडेल करू अशी ग्वाही दिली.त्यानंतर शनिवार पेठेत विराट सभा झाली, या सभेला आमदार सदाभाऊ खोत, रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, प्रा येताळा भगत, जमदाडे सर, सुधीर करंदीकर, सोमनाथ आवताडे, अनिल बोदाडे, राजेंद्र सुरवसे , लक्ष्मण जगताप,  गोपाळ भगरे, विजय बुरकूल, बाबा कोंडुभैरी, सरोज काझी, सत्यजित सुरवसे, दत्ता भोसले, दिगम्बर यादव, चंद्रकांत पडवळे, हरी ताम्हणकर, तानाजी जाधव, अप्पा बुरकुल, तात्या कटारे, योगेश फुगारे, संजय माळी, महेश भीमदे, बबलू सुतार, कैलास कोळी, आझाद पटेल, शिवा जाधव, शकील काझी, सुरेश मेटकरी यांच्यासह भाजप व सर्व मित्र पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *