ताज्याघडामोडी

अवकाळीने नुकसानग्रस्त फळबागा व शेतीची अभिजीत पाटील यांनी केली पाहणी

पंढरपूर प्रतिनिधी:सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेकडो हेक्टरवरील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने तुंगत,सुस्ते,तारापूर,देगाव,ईश्वर वठार या गावातील फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.आधीच कोरोनाचं संकट त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरीराजा उद्ध्वस्त झाला असून शेतक-यांच्या हातातोंडाला आलेल्या घास हिरावला गेला आहे.अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागांना काल अभिजीत पाटील यांनी भेट देऊन त्या भागातील नुकसानीची पाहणी केली.तसेच शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची महिती त्यांनी यावेळी दिली.सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे व गारपिटीमुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, बेदाणा शेड,अशा पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.तसेच सुसाट्याच्या वा-यामुळे विजेचे खांब,झाडे उन्मळून पडून अनेक बागांचे तसेच काहीच्या घराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच नेहमी निसर्गाच्या चक्रात सापडतो.कोरोनाच्या संकटासोबतच कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ,कधी महापुर, कधी वादळ, तर कधी गारपीठ.या सा-या संकटांचा त्याला वेळोवेळी सामना करावा लागतो.त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व आधार आवश्यक असतो.काहीही झालं तरी शेतकरी खचला नाही पाहिजे अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी त्यांनी स्वतः फिरून शेतक-यांची भेट घेऊन सुस्ते, बीटरगाव, ईश्वर वठार, या भागात नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना धीर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *