

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार व धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची शशांक तुकाराम मराठे याने प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई यानी फेसबुकवर धनगर समाजाची तसेच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करत टीका केली आहे.मुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत अश्या विकृतिकडून नेहमीच महापुरुष व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत असतात अशा विकृत बुध्दीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात हे अतिशय दुर्दैवी आहे असे निवेदन आज बारामती शहर पोलिस स्टेशन चे निरीक्षक यांना निवेदन दिले.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ही निवेदन पाठवणार असल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी तक्रार दिली.यावेळी बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे, वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत.