जमिनीच्या वादातून बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात दोघे जण जख्मी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा ताबा पोलिसांच्या पथकाने घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मुद्रांक नोंदणी कार्यालयामध्ये शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जमिनीच्या […]
गुन्हे विश्व
लेक युक्रेनमध्ये अडकली; भामट्याने फ्लाईट तिकीट देतो सांगून आईला घातला 44 हजारांचा गंडा
रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि […]
भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार, धमकी देऊन पैसेही उकळले
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर […]
10 लाखांच्या खंडणीसाठी 17 वर्षीय मुलाची हत्या, आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पैशांसाठी एका 17 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या बंगावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला पकडलं असून त्याच्याकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बंगावातील 17 वर्षीय चेतन खोब्रागडे या मुलाची हत्या झाली. […]
१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये
आर्थिक गुन्हे शाखेच्या उज्जैनमधील पथकानं देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाईदरम्यान कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला. कन्नौदजवळील डोकाकुई गुडबेल गावात असलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकाच्या घरावर ईओडब्ल्यूच्या पथकानं धाड टाकली. प्राथमिक तपासाताच त्यांच्या हाती कोट्यवधींची संपत्ती लागली. विशेष म्हणजे व्यवस्थापकाचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे. काळ्या […]
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यानी दिला चोप
नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळावी म्हणून एका गरीब गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत व्यक्तीने या असाह्य महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याने संबंधित महिला चिडली. तीने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली. […]
पोटच्या लेकीनेच केली बापाची निर्घृण हत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी याठिकाणी एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला करून आपल्या जन्मदात्याचा जीव घेतला आहे.पोलिसांनी संशयित तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या बर्गे मळा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास […]
नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला
शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना डाेंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी परिसरातील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे रात्री हृदयविकाराने […]
आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले
गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सिरियल्स बघून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतात. पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नसून गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलंय. पुण्यातील […]
कल्याण काळेंनी आमच्या शेतातील ऊस पेटवला
वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम धोंडीबा नाईकनवरे यांच्या शेतातील ऊस कल्याण उत्तम काळे रा-वाडी कुरोली ता पंढरपुर यानेच मुद्दाम खोडसाळपणाने आमचे अर्थीक नुकसान व्हावे ह्या उद्देशाने सदरचा ऊस पेटवुन दिलेला आहे अशा आशयाची फिर्याद वाडीकुरोली येथील शेतकरी तुकाराम नाईकनवरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादी नुसार फिर्यादी तुकाराम धोंडिबा नाईकनवरे हे […]











