गुन्हे विश्व

पोटच्या लेकीनेच केली बापाची निर्घृण हत्या 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी  याठिकाणी एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला  करून आपल्या जन्मदात्याचा जीव  घेतला आहे.पोलिसांनी संशयित तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या बर्गे मळा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर 21 वर्षीय मुलगी साक्षी शांतीनाथ केटकाळे हिने लोखंडी गजाने बापाच्या डोक्यात घाव घातला. 

आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने शांतीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वी केटकाळे यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.लेकीनेच बापाची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *