गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

क्राईम मालिकेतून कल्पना घेऊन महिलेचा खून; कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजल्या

४२ वर्षीय महिलेला कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजून तिचा खून केल्याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या मौल्यवान वस्तू लुटणार्‍या आरोपीने गेल्या तीन महिन्यांत टीव्ही क्राईम मालिकेतून कल्पना घेतल्यानंतर खुनाची योजना आखली. रविवारी सकाळी घरकाम करणाऱ्या पीडितेचा मृतदेह हडपसर येथील वैदूवाडी परिसरात आढळून आला. तिच्याकडे दागिने, भ्रमणध्वनी आणि एटीएम कार्ड आढळून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बारामतीच्या ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकास लाचखोरी प्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र पोलीस दलाबाबत या राज्यातील जनता मोठा अभिमान बाळगताना दिसून येते.एकीकडे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र पोलीस दलावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच सर्वसामान्य जनतेचा मात्र महाराष्ट्र पोलीस दलाबाबतचा अभिमान तुसभरही कमी झाला नाही असेच दिसून येते,आणि त्याला कारण आहे अजूनही या पोलीस दलात सर्वसामान्य जनतेला अतिशय आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे कर्तव्यकठोर पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात घडला खबळजनक प्रकार 

पंढरपूर शहरात राहणारे एका कुटूंबातील पती पत्नीने आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणे चालू केले होते.त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीम मध्ये दिलेले होते सुरवातीस जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड रा. पंढरपूर याने डायटस घेण्याची माहिती देणेसाठी विवाहीत स्त्रीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला चार वर्षे घरात डांबले, पोलिसांच्या मदतीने झाली सुटका

बीड शहरातील एका महिलेस चारित्र्याच्या संशयावरून तिच्याच पतीने तब्बल चार वर्षांपासून घरात डांबून ठेवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे या महिलेची आज सुटका करण्यात आली. जालना रोडवरील रुपाली मनोज किन्हीकर यांचा वीस वर्षांपूर्वी श्रीमंत घरामध्ये विवाह झाला. सुखी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून रुपाली यांनी संसाराला सुरुवात केली. सुरुवातीची दोन-तीन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुगारासाठी पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या, घटनेने खळबळ

पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी, सासू आणि सासऱ्यावर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सूरज उगलमुगले असे हल्ला करणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी वारंवार सासऱ्यांकडे पैशाची मागणी हा पोलीस कर्मचारी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ही आत्महत्या नाही तर हत्या, ‘त्या’ तिघांना सोडू नका

आग्रा येथे एका बीटेकच्या चौथ्या वर्षाला शिकणाऱ्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाचे वडील भाजपाचे नेते आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. नगला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या बाप-लेकावर गुन्हा दाखल

वीज वापराची नोंद वीजमीटरमध्ये कमी प्रमाणात होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून 71 हजार 420 रुपये किमतीची वीजचोरी केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय नरसिंह चिंतामणी व पंकज दत्तात्रय चिंतामणी (दोघे रा. सिद्धिविनायक सोसायटी, सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत (रा. रासणेनगर, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल  झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाण्याचा जार घेण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग

आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत तरुणीला झाऱ्याचे चटके देऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात पीडित तरुणी दोन मैत्रिणीसह राहते. ही तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्न लावतो सांगून 200 मुलींना लावला चुना; शेवटी स्वत:लाच केलं मृत घोषित

उत्तर प्रदेशातील बस्ती पोलीस आणि सर्विलान्स टीमने एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या नटवरलालवर देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बस्तीतील एका मुलीची या गुन्हेगाराने फसवणूक केली. यानंतर हा खुलासा झाला. मुलीने तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की, यात केवळ एकच मुलगी नाही तर अशा […]