गरबा खेळण्याच्या ठिकाणी आणि दंड थोपटल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला. शिवाय घटनास्थळावर फायरिंग झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी धुळे शहरातील भाजपा नगरसेविकेचा मुलगा मित भामरे याच्यासह अन्य दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. […]
गुन्हे विश्व
विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने जे केलं त्यामुळे…
अहमदनगरच्या कोपरगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेथे एका विवाही तरूणीची तिच्या काकानेच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर एका मुलाशी बोलत होती, हे पाहून काका संतापला आणि त्याच भरात त्याने हे कृत्य केल्याचमे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी काकाला ताब्यात घेत अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या […]
सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं
अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हा कट रचल्याचं समोर आलं आहे. या दोघींनी अन्न आणि पाण्यातून […]
फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या, मग मुलीलाही संपवलं
मुंबईतून ऑनर किलिंगचं मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपी गोरा खानने त्याचा मुलगा आणि साथीदारांसोबत मिळून आपली मुलगी गुलनाज खान आणि तिचा हिंदू पती करण चंद्र यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनं […]
मध्यरात्री गर्लफ्रेण्डला भेटायला गेला, सकाळी थेट मृतदेह आढळला, तरुणासोबत नेमकं काय घडलं?
प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आलं. बिहारमधील कैमूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले. तर प्रेयसीचे कुटुंबीय फरार झाले आहेत. प्रेमप्रकरणाचे हे प्रकरण भभुआ […]
हॉटेल चालवायचे असेल तर खंडणी दे; मी इथला भाई, तरुणानं कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली, अन्…
पाम बीच गॅलरीया मॉलमधील सेवेन्थ स्काय हॉटेलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या भावाची गुंडगिरीसमोर आली आहे. राहुल आंग्रे याने चक्क पिस्तुल दाखवून हॉटेल कर्मचाऱ्यांना धमकी आणि दमदाटी शिवीगाळ करत खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल आंग्रे यांच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनी देखील हॉटेलची तोडफोड करत धांगडधिंगा घातला […]
भाऊ-वहिनीला संपवलं, पुतण्याला जिवंत कालव्यात फेकलं, भावाचं हादरवणारं कृत्य
पंजाबमध्ये ट्रिपल मर्डर केसची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यसनी तरुणाने स्वतःच्या मोठ्या भावाची, वहिनीची आणि २ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खरारमधून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लखविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक कलहामुळे आरोपी लखविंदर सिंगने त्याच्या मित्रासोबत तिघांची हत्या […]
विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले; एक हात, दोन पाय तुटले
सीबीगंजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थीनीची दोन तरुणांनी छेड काढली. यास विरोध केल्याने या विद्यार्थीनीला वेगवान ट्रेनच्या समोर फेकण्यात आले.यामध्ये तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तसेच काही हाडांनाही फ्रॅक्चर आले आहेत. पीडिता गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले […]
पत्नीचा घरी येण्यास नकार, पतीला संताप अनावर; सासरी विनंती करुन कंटाळला, रागात धक्कादायक कृत्य
पत्नी घरी परत येत नसल्याने संतापलेल्या पतीने सासूवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीलाही जखमी केले. ही धक्कादायक घटना पारडी परिसरात घडली. जखमी सासूवर मेयोत उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.राजेंद्र साहू (२८, डिप्टी सिग्नल, दुर्गा माता चौक) असे आरोपीचे नाव आहे आणि दुलेश्वरी (वय २८) असे पत्नीचे नाव आहे. […]
मित्र गप्पा मारत बसले होते; अचानक तरुणाने पिस्टल काढलं, अन्
कल्याण येथील मोहने परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला होता. कल्याण गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत आरोपी उमेश खानविलकर (३०) याला अटक केली आहे. उमेश रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून उमेशने हा गोळीबार केल्याची माहिती […]











