जालना, 23 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जात आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. तर रुग्णांचे कुटुंबीय आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार होतं आहेत. अर्थातच याचा आर्थिक फटका रुग्णाच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. अशी एकंदरित स्थिती असताना जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका […]
गुन्हे विश्व
पंढरपूर तालुक्यातील डेअरी चालकाच्या तोंडात ऍसिड ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न
रोपळे तालुका पंढरपूर येथील विश्वंभर सोपान कदम वय-57 वर्षे,धंदा-शेती व दुध डेअरी या चालकाने गावातील नितीन रघुनाथ कदम यास गावातून दूध संकलन करून डेअरीस देण्यासाठी दिलेल्या कमिशन पोटीच्या ऍडव्हान्सचे ४३ हजार पाचशे रुपये वारंवार चारचौघात मागतो म्हणून डेअरी चालक विश्वंभर कदम यास शिवीगाळ करत तु नेहमी चारचौघात मला पैसे मागुन माझी बेईज्जत करतो,माझी लोकांमध्ये आब्रु खातो,तुझे कसले पैसे मला […]
गृहमंत्र्यांच्या नावाने पाच लाखांची मागणी करणाऱ्या पीआयची चौकशी
पुणे:कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुरु केली आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या संदर्भतील चौकशी निपक्षपातीपणे व्हावी या साठी विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना बार्शी येथे पाठवले होते. त्या संदर्भात […]
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड
पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]
35 हजारात remdesivir चे इंजेक्शन, धक्कादायक प्रकार समोर
नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीरची मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील […]
आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारत मध्यस्थावरच तलवारीने वार
आठ दिवसापूर्वीच्या भांडणाचा राग मध्यस्थावर काढत तू आमच्या भांडणात का पडला असा जाब विचारत भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आल्याची घटना पुणे येथील खडकमाळ अळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी रोहीतचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपुर्व भांडणे झाली होती. […]
लाच प्रकरणातील ‘त्या’ मुख्याध्यापकाची शिक्षा हायकोर्टाने केली रद्द
शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि […]
भरचौकात ‘लेडी डॉन’ची चाकूने वार करून हत्या
वस्तीत दबंगगिरी करणारी पिंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद […]
पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास
सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, […]
भाजपा आमदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या
बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले […]











