गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीला सरकारी नोकरी लावतो, समस्या दूर करतो.. महिला पोलिसावर भोंदूबाबा आणि साथीदारांचा अत्याचार

भोंदूबाबांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि लुबाडणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सन २०१८पासून हा प्रकार सुरू होता. अखेर याविरोधात तक्रार केल्यानंतर तलासरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तक्रारदार महिला ही पोलिस असून, तिच्या पतीच्या माध्यमातून भोंदूबाबाशी ओळख झाली. पतीला सरकारी नोकरी लागेल, तसेच घरगुती समस्या दूर होतील, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या

कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची पतीने मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर चाकूने भोसकून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे सध्या राज्यात या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक नजद गुलाब सैय्यद यांची मुलगी तथा ठाकरे गटाच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चौथीतील मुलीकडं रोज पैसे येऊ लागल्यानं पित्याला संशय, शाळेतील ‘त्या’ कारनाम्यानं हादरले पालक

वसईतील एका शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीकडं खाऊ खाण्यासाठी रोज पैसे जास्त येत असल्यानं पालकांना शंका आली. मुलीकडं दररोज पैसे कुठून येतात, याची खात्री करण्यासाठी मुलीचे पालक शाळेत गेले. तेव्हा राजाराम मौर्य हा तिला खाऊचे आमिष दाखवून लैगिंक चाळे करीत असल्याचे समजले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी हे वालीव पोलिसांना सांगितलंय. घटनेमुळं संतप्त नागरिकांनी शाळेत मोठा संतप्त जमाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मेकअप आर्टिस्टचा लिव्ह इन पार्टनरकडून खून; सुटकेसमध्ये मृतदेह भरुन गुजरातमध्ये फेकला

चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टीस्ट असलेल्या तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनरनं त्याच्या पत्नीसोबत मिळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नेना महत असं खून झालेल्या मेक अप आर्टीस्टचं नाव आहे. तर मनोहर शुक्ला असं मारेकरी लिव्ह इन पार्टनरचं नाव आहे. नायगावात खून केल्यानंतर या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन मारेकऱ्यांनी गुजरातमधील वापी परिसरात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गवंडी कामाचे पैसे अडकले होते; मजुरी मागण्यासाठी गेला, मालकाला आला राग, अन् चौघांनी घडवलं धक्कादायक कृत्य

गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी, दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव गाव येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दादा गांगुर्डे (४०) असे मयत मजुराचे नाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला मंदिरातून घराकडे निघाली; रिक्षात बसली, अन्…, धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदाराने आपसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निर्वस्त्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोठ्या विश्वासानं कामावर ठेवलं; मोलकरणीचे धक्कादायक कृत्य, मालक पोलीस दरबारी, नेमकं काय घडलं?

घरात दिवसभर मोलकरीण काम करत असेल तर सावधान रहा. डोंबिवली जवळच्या दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये राहत असलेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरातून एका मोलकरीणने २ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अमित भास्कर म्हात्रे (४२) असे तक्रारदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच नाव आहे. ते रिजेन्सी इस्टेटमध्ये मध्ये राहतात. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासू-सुनेचं भांडण टोकाला;सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या

नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने स्वतःच्या ८० वर्षीय सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हत्येची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; संशय येताच पोलिसांनी गाडी अडवली, कोट्यवधींचा गांजा जप्त

वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून गांजाची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये किमतीचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक दोनने नगर रस्त्यावर ही कारवाई केली. संदीप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. रायगड), निर्मला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवऱ्याने गर्भवती बायकोला वरवंट्याने ठेचलं, स्वत:चाही जीव घेतला; चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात रडत राहिली

पतीने गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथे उघडकीस आला. हा प्रकार आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री घडला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पत्नी गंगा ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. गंगा धनाजी गायकवाड (वय […]