ताज्याघडामोडी

मधाचा मोहोळ काढण्याच्या नादात १२ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

तालूक्यातील सुरेगाव रास्ते येथे एक दुर्देवी घटना घडली आहे.शेतातील विहिरी जवळ असलेले मधाचे मोहोळ काढण्यासाठी गेलेला १२ वर्षीय बालक ऋषीकेश गजानन चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेला. विहीरीजवळील मधाचे मोहोळ काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी मधमाशा त्याच्यामागे लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी विहिरीच्या कठड्यावरुन त्याचा पाय घसरला. […]

ताज्याघडामोडी

धाकट्या बहिणीची निधनवार्ता समजली; पाणी भरणारी थोरली बहिण जागीच कोसळली

धाकट्या बहिणीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच गावातच राहणाऱ्या थोरल्या बहिणीनेही नळावर पाणी भरत असतानाच प्राण सोडले. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे काल शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे. या सख्ख्या बहिणींची एकत्रच अंतयात्रा काढून गावकऱ्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. चंद्रभागा गंगाराम पैठणकर […]

ताज्याघडामोडी

दुचाकींवरून अचानक आठ जण कोयते घेऊन आले; वडापाव विक्रेत्यावर हल्ला

भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे. कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला […]

ताज्याघडामोडी

रस्त्यातच रुग्णवाहिकेतील डिझेल संपलं; रुग्णाच्या कुटुंबानं धक्का देत हॉस्पिटल गाठलं

राजस्थानच्या बांसवाडात डिझेलमुळे एका रुग्णाचा जीव गेला. रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेनं निघाली असताना वाटेतच डिझेल संपलं. यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला धक्का देऊन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंधन पूर्णपणे संपल्यानं रुग्णवाहिका सुरू होऊ शकली नाही. बऱ्याच प्रयत्नांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत रुग्णानं जीव सोडला आहे. बांसवाडात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची प्रकृती […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन साजरा तसेच २६/११ च्या वीरांना विनम्र अभिवादन

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी  फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.   संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “आडियाथाॅन” कार्यक्रम संपन्न

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी “आडियाथाॅन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.   या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डाॅ. अतुल सागळे, अमोल निटवे, प्रा. अतिष जाधव, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. मदणे, प्रा. सचिन […]

ताज्याघडामोडी

उभ्या ट्रकला धडकून गाडीचा चक्काचूर, गटविकास अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

अमळनेर येथील गटविकास अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कामासाठी नाशिकला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये जळगावच्या अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले आहेत. आज बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला. धरणगाव गावाजवळील भोणे फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात चौधरी यांच्या […]

ताज्याघडामोडी

बायको सोडून गेली; प्रेयसीचा पळण्यास नकार; संतापलेल्या प्रियकरानं केला धक्कादायक प्रकार

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात एक वेगळीच घटना घडली आहे. आपल्यासोबत पळून जाण्यास नकार दिल्यानं एका विवाहित प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांच्या मालकीचा मिनी ट्रक आणि भाजीचं दुकान पेटवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि महिलेचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. याबद्दल समजताच आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली. प्रेयसीनं आपल्यासोबत वाघोदा गावात यावं, त्यासाठी घर सोडावं […]

ताज्याघडामोडी

२६ नोव्हेंबर रोजी टीसीएस या कंपनीतर्फे स्वेरीमध्ये ‘कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन

पंढरपूर- येत्या शनिवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गत दोन वर्षांमध्ये म्हणजे सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी टीसीएस तथा ‘टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडून ‘कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. […]

ताज्याघडामोडी

चारित्र्यावरील संशयाने पत्नीचे मुंडन करून दिला तोंडी तलाक

माहेरातून पाच लाखांची रक्कम घेऊन येत नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मुस्लीम नवविवाहितेचे डोक्यावरील संपूर्ण केस कापून विद्रूप केले आणि नंतर तलाक, तलाक, तलाक असे तोंडी संबोधून नांदविण्यास नकार देत तिला माहेरी सोडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी मुस्लीम महिला संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला […]