ताज्याघडामोडी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन साजरा तसेच २६/११ च्या वीरांना विनम्र अभिवादन

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
करण्यात आला.यावेळी  फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस, पॉलिटेक्निकचे
प्राचार्य प्रा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.

  संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर
साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन
झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची
राज्यघटना २६  नोव्हेंबरला तयार झाली असली तरी ही घटना २६  जानेवारी १९५०
 रोजी भारतीय जनतेला अर्पण  करण्यात आली.
  तसेच याच दिनी मुबंई येथे झालेल्या २६/११ च्या  भ्याड दहशतवादी
हल्ल्यामध्ये  वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
करण्यात आले. यावेळी संविधान दिन  व  मुबंई येथे झालेल्या २६/११ च्या
दहशतवादी हल्ल्या विषयीची विस्तृत माहीती पॉलिटेक्निकचे प्रा.संग्राम
मेटकरी यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा अमोल मेटकरी व प्रा.मिस
संगिता खंडागळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप
फार्मसीचे प्रा. अमोल पोरे यांनी केले.या कर्यक्रमासाठी
अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व
शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *