केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकार तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात रुग्णानं महिला डॉक्टरवर कात्रीनं हल्ला करुन तिचा जीव घेतला. पोलिसांनी रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वंदना दास असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्या केरळच्या कोट्टायमची रहिवासी होत्या. २३ वर्षांच्या वंदना हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या. संदीप […]
ताज्याघडामोडी
सासरच्या लोकांशी किरकोळ वाद, विवाहितेला उठाबशा घालायला लावल्या अन्…
घरगुती करणाहून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहितेला घरात तब्बल १५० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे; तसेच विवाहितेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. हा प्रकार ९ मे रोजी किवळे येथील आदर्शनगर येथे घडला. या प्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसिन मुबारक मुल्ला, […]
शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का, सरकार स्थिर आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही स्पष्टपणे बोलले. आम्ही आशावादी आहोत, […]
कर्नाटक निवडणूक; टाइम्स नाउचा एक्झिट पोल, भाजपला धक्का, काँग्रेसची सत्ता येणार!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं. विधानसभेच्या संपूर्ण २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा १३ मे रोजी म्हणजे येत्या शनिवारी लागणार आहे. पण त्यापूर्वी वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सचे आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. टाइम्स नाउच्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाइम्स नाउ […]
वृद्ध महिलेचा घरातच मृत्यू, शरीरावर १४ जखमा, सर्वांना वाटलं अपघात पण, सत्य कळताच सारे हादरले
दिल्ली पोलिसांनी ८६ वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकललं आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी या वृद्ध महिलेच्या सुनेला अटक केली आहे. फ्राईंग पॅनने या निर्दयी सुनेने वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हशी सोम (८६) ही वृद्ध महिला नेब सराय भागात आपल्या मुलासोबत राहत होती. महिलेचा मुलगा सुरजित […]
सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देण्याची शक्यता; सरन्यायाधीशांकडून संकेत
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. कारण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आम्ही उद्या दोन प्रकरणांवरील निकाल देणार आहोत, असं सांगितलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी उल्लेख केलेल्या दोन प्रकरणांमधील एक प्रकरण हे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात मागील वर्षी जून महिन्यात अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या […]
शांतीने स्वत:ला संपवलं, नवऱ्याचा माहेरी फोन; या नवविवाहितेसोबतही तेच घडलं जे अनेक महिलांसोबत होतं
बिहारमधील सुपौलमध्ये एका नवविवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी महिलेचा गळा आवळून खून केल्याचे […]
झोपेतून उठला, पळत सुटला, तिसऱ्या मजल्यावरुन पडला; पत्नीसोबत रुग्णालयात गेलेल्या तरुणाचा अंत
मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये सोमवारी सकाळी तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या मजल्यावर झोपलेल्या तरुणावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरुण पळत सुटला. गडबडीत त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश […]
“विधानसभा अध्यक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत.”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; सुप्रीम कोर्टाबाबतही मांडली भूमिका!
आठवड्याभरात सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती शाह यांचाही समावेश होता. त्यामुळे त्याआधीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. हा निकाल काय असेल, यावर अंदाज बांधले जात असून त्यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे. आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार […]
सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, तो म्हणाला, हे तुमचं वय नाही अन् मग भयंकर घडलं
सिगारेट पेटवण्यासाठी माचिस देण्यास नकार दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला आहे. आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही दोन्ही मुलं १५ आणि १६ वर्षांची असल्याची माहिती आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये रविवारी रात्री उशीरा ही खळबळजनक घटना घडली तर सोमवारी सकाळी ती उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या […]