ताज्याघडामोडी

यापूर्वी कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस ठरलेल्या वेळेतच मिळणार

कोविशील्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कोविशील्ड लसीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच […]

ताज्याघडामोडी

ना.दत्तात्रय भरणे यांच्यावरील टीका थाबवा अन्यथा आंदोलन

भवानीनगर -उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी 22 गावांना मंजूर केल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.ही टीका थांबवा, अन्यथा सावता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू व तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी दिला. राजगुरू, नेवसे म्हणाले की, इंदापुरातील अनेक शेतकऱ्यांच्या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी जमिनी गेलेल्या […]

ताज्याघडामोडी

लसीकरणाबाबत नव्याने पुढे आला निष्कर्ष

नवी दिल्ली 16 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेत आणखीच भर टाकत आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत लसीकरण हे सर्वात मोठं आणि महत्तावाचं हत्यार मानलं जात आहे. अशात नुकतंच लसीकरणाबाबत झालेल्या नव्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे, की लस घेतलेले 97.38 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गापासून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर ६२ तर तालुक्यात पुन्हा २८६ कोरोना बाधितांची भर 

पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने चिंतेत भर पडली असून आज प्राप्त झालेल्या अहवालात पंढरपूर शहरात ६२  तर ग्रामीण मध्ये २८६ तर कोरोना बाधितांची भर पडली आहे. सध्या पंढरपुर शहर व तालुक्यातील २७५४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.आणि हा आकडा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! बनावट रेमडेसिविर इंजेक्शन घेणाऱ्यांची कोरोनावर मात, ९०% रुग्ण बरे; पोलिसांसमोर पेच

मध्यप्रदेशमध्ये नकली रेमेडेसीविर इंजेक्शन प्रकरण चर्चेत असताना तपास अधिकाऱ्यांना आता कात्रीत सापडण्याची पाळी आली आहे. नकली रेमेडीसीवर घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती त्याच इंजेक्शनने सुधारली आहे. संक्रमणावर त्यांनी मात दिली आहे. आता पोलिस कुणावर अन कशी कारवाई करणार हा पेच प्रशासनासमोर उभा झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्या निर्देशांचे पालन कसे करावे यातून पोलिस चक्रावले आहेत. भोपाळ‌. मध्यप्रदेशचे […]

ताज्याघडामोडी

पुणे महापालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याकडून पंढरीतील ५०० कुटुंबाना धान्य वाटप

कोरोनामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून पंढरीत अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांनी येथील ५०० गरजु कुटुंबाना धान्य पाठवून दिले. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.  घाटे कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून नगरसेवक धीरज घाटे अनेक वर्षा पासून पुणे येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना नियम मोडल्याने दीड लाखांच्या खंडणीची मागणी, जबाबदार कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : दीड लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईत एमआयडीसी पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे आणि नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक ! पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालत जीवघेणा हल्ला

त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुनील पाटील (पोलीस निरीक्षक) हे जखमी झालेले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, संचारबंदीमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर आंबी-खालसा शिवारात घारगाव […]

ताज्याघडामोडी

आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची […]

ताज्याघडामोडी

मोदीजी हमारे बच्चोंके व्हॅक्‍सिन विदेश क्‍यु भेज दिया !

दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पोस्टर्स लावण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही पोस्टर्स लावणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी 17 गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली आहे. ही पोस्टर्स प्रामुख्यान लसींच्या तुटवड्याबद्दल तक्रार करणारी आहेत. मोदीजी हमारे बच्चोंके व्हॅक्‍सिन विदेश क्‍यु भेज दिया असा प्रश्‍न यात पंतप्रधानांना उद्देशून […]