भोपाळ – काँग्रेस नेते आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या भोपाळमधील शाहपूरा परिसरात असलेल्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमुळे महत्त्वपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुसाईड नोट जप्त केली […]
ताज्याघडामोडी
कोविनवर उपलब्ध झाला स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय
नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात मोठे हत्यार असल्यामुळे जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग भारतात देखील वाढण्यात आला असून आता १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याच्या […]
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा चिंताजनक वाढ
सोलापूर जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधितांचे प्रमाण काहीसे घटले असताना पंढरपुर शहर व तालुक्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे.गेल्या तीन दिवसात पंढरपुर शहरात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या काहीसी घटू लागल्याचे चित्र होते मात्र आज त्यात पुन्हा वाढ झाली असून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपुर शहर ८८ तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून २८१ इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना […]
RBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क ! 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट जाणून घ्या
नवी दिल्ली । जर आपण डिजीटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरबीआयने कोट्यावधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सांगितले की, 23 मे रोजी एनईएफटी सर्व्हिस काही तास चालणार नाही, तर मग तुम्ही आधीपासूनच कामाचे नियोजन करा. आपल्याला या मुदतीच्या आत कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते अगोदरच […]
धक्कादायक | व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने माजी सैनिकाने गमावले प्राण, दहा दिवस सुरु होती धावपळ
बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच योग्य वेळी वैद्यकीय सोय उपलब्ध न झाल्याने एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्या माजी सैनिकांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना […]
सरकारी धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत केंद्राच्या कोरोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-२ जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन साथरोगतज्ज्ञ शाहिद जामील यांनी राजीनामा दिला आहे. भारतामधील काही वैज्ञानिकांचा कोरोनाच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे जामील हे प्रमुख होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे पद सोडत असल्याचे जाहीर केलं. […]
‘अजितदादा बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का?’
राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे. तसंच अजितदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस असून तुमचे सरकार […]
DRDOने विकसित केलेले कोरोना प्रतिबंध औषध 2-DG आजपासून मिळणार
देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता कोरोना लसीसह कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मंजूरी दिली जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषध २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose ) ला काही दिवसांपूर्वी डीजीसीआयने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. आजपासून 2-DG कोरोनावरील औषध […]
पुण्यात टोळीयुद्धातून गुंडाचा खून लव यू भाऊ असं म्हणत अंत्ययात्रेला तुफान गर्दी
पुण्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी तुम्ही पाहिली असेल, त्यानंतर थाटामाटात मागे पुढे चारचाकी गाड्यांसह भाऊंचे स्वागत करण्यासाठी मित्र परिवार आलेला असतो. आता पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती, लव यू भाऊ असं म्हणत त्यांनी दु:खही व्यक्त केलं, या घटनेची पुणे शहरात नागरिकांमध्ये […]
पत्नीकडून पतीचा खून, मुलगाही होता सहभागी, गुपचूप उरकला अंत्यविधी, ‘असं’ पडलं पितळ उघडं
औरंगाबाद : पती रोज दारू पिऊन त्रास देतो म्हणून चक्क त्याच्या पत्नीने त्याचा ‘काटा’ काढल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथे घडली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सदर पत्नीने आपल्या पतीची हत्या आपल्या मुलाच्या मदतीनं केली आहे. मृत पती दररोज दारू पिऊन घरी येतो आणि त्रास देतो. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी दारुच्या […]











