ताज्याघडामोडी

राज्यात 4 टप्प्यांमध्ये उठवला जाऊ शकतो Lockdown, ‘या’ पध्दतीची आहे ठाकरे सरकारची योजना, जाणून घ्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांची परिस्थिती बिकट करून सोडली आहे. म्हणून रुग्णाची वाढती संख्या पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावला. १ जूननंतर लॉकडाऊन उठणार का अशा चर्चा लोकांमध्ये सुरु आहेत. मात्र सध्या रुग्णाची संख्या घटत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाउन शिथिल करण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी संकेत दिले आहे. मुख्यतः राज्य सरकार राज्यातील […]

ताज्याघडामोडी

भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर बंद होणार?

नवी दिल्ली : भारतात सध्याच्या घडीला कार्यरत असणाऱ्या फेसबुक , ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या समाजमाध्यमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किंबहुना येत्या 2 दिवसांमध्ये या माध्यमांवर बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच केंद्र शासनानं या समाज माध्यमांच्या कंपन्यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करत नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठी सरकारनं या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधीही दिला होता. हा […]

ताज्याघडामोडी

काही महिन्यांतच घ्यावा लागणार Covid vaccine चा तिसरा डोस? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली 25 मे : भारतात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. भारतात डबल म्युटंट विषाणू दिसून आला आहे. हा म्युटंट विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार आता उपाययोजना सुरू आहेत. ब्रिटनमध्ये आता ट्रिपल म्युटंट कोविड विषाणू सापडला आहे. तो डबल म्युटंटपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूची नवनवी […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात प्रशासन करणार कोरोना बाधितांचा पाठपुरावा

पंढरपुरात प्रशासन करणार कोरोना बाधितांचा पाठपुरावा           कोरोना बाधितांच्या गावांवर प्रशासनाचे लक्ष, कडक अंमलबजावणी, चाचण्यावर भर,  एकाही रुग्णांला घरी नाही ठेवणार                     पंढरपूर, दि. 24 : पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी  महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने  नियोजन करण्यात आले आहे. गांव निहाय कोरोना बाधित […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८.. अन् बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज

बीड : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८ असतानाही तसेच उपचार बाकी असतानाही केवळ बेड रिकामा करण्यासाठी घाई गडबडीत एका रूग्णाला डिस्चार्ज देण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयात झाला आहे. नातेवाईकांनी तक्रार करताच हा डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार चालू ठेवण्यात आले. परंतू या निमित्ताने जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभार आणि जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक […]

ताज्याघडामोडी

भीती वाटते…काळजी करू नका फोनद्वारे होणार समुपदेशन जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालयाचा उपक्रम

भीती वाटते…काळजी करू नका फोनद्वारे होणार समुपदेशन जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालयाचा उपक्रम सोलापूर, दि.24: तुम्हाला भीती वाटतेय का… तुमच्या मनावर ताण येतोय का… चिंता करताय का…. घाबरू नका तुमची भीती, काळजी, चिंता जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालय दूर करणार आहे. जिल्हा प्रशासन आणि संगमेश्वर महाविद्यालयाने कोरोना काळातील जनतेच्या मनातील भीती घालविण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक केली […]

ताज्याघडामोडी

बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा !

गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात विविध जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले.  बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा ! मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे […]

ताज्याघडामोडी

कोविड मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची नुकसानभरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशात कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली पाहिजे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करीत आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. कोविडमुळे मरण पावलेल्यांना जी मृत्यूप्रमाणपत्रे दिली जातात त्यात एकसमानता असण्याची गरजही कोर्टाने व्यक्‍त केली आहे. […]

ताज्याघडामोडी

करोनाची दुसरी लाट ओसरली; पुढील आठवड्यापासून अनेक राज्यांमध्ये सुरू होणार ‘अनलॉक’ प्रक्रिया

नवी दिल्ली – मागील काही दिवसांत देशात करोनाने तैमान घातलं होतं. देशात लाखोंच्या संख्येने रुग्ण वाढत होते. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. राज्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला यश आले असून देशातील नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉकडाऊन हटविण्याचे संकते दिले आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश आणि […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट : आजच्या अहवालाने शहर तालुक्यास मोठा दिलासा

आज दिनांक २४ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालाने पंढरपुर शहर व तालुक्यास थोडासा दिलासा दिला असून पंढरपूर शहरात १३ तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात ५० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार ३ व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २४ मे […]