जमिनीच्या वादातून घराला आग लावत विवाहितेसह दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हल्ल्लेखोराच्या टोळीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील वासुंद्री परिसरात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशिष पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे […]
ताज्याघडामोडी
माझ्या विरोधात कारवाई केली, तर तो व्हिडीओ बाहेर काढेन; आमदार नितीन देशमुख यांचा शिंदे सरकारला इशारा
अकोला येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचे शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे देखील उपिस्थत होते. आमदार नितीन देशमुखांनी सुरत आणि गुवाहाटीमधील अनेक गुढ उकलण्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या ठिकाणचे अनेक व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा त्यांनी गंभीर इशारा दिला आहे. नितीन देशमुख म्हणले आहेत की, […]
आधी 15 मिनिटं तोंड पाण्यात बुडवलं, नंतर शिर धडावेगळं केलं
वसईतील भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील डोकं नसलेल्या मृतदेहा प्रकरणी आता खुलासा झाला आहे. सानियाच्या हत्ये प्रकरणी आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. तर याआधी सानियाच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. हत्येत सानियाचा सासरा, दीर आणि मेव्हणा यांच्यासह संपूर्ण कुटुंब सहभागी आसल्याचं समोर आलं आहे. सानियाला या कुटुंबाने पाण्यात 15 मिनिटं तोंड बुडवून निर्घुणपणे मारलं आणि […]
अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तिच्याच जन्मदिनी केला व्हायरल; गुन्हा दाखल
वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्याच वाढदिवसा दिवशी व्हायरल केला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी शहरातील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून एका मुलीचा अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करुन तिच्या वाढदिवशीच सोशल मीडियावर […]
रागाच्या भरात तरुणाने सख्ख्या भावालाच संपवलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार
राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातही हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भाऊ हा संकटात मदत करणारा असतो. मात्र, पुण्यात एका भावाने आपल्या लहान भावाची हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला. हत्येची ही घटना कात्रज-कोंढवा […]
गुगल पेद्वारे पैसे पाठवून लोकेशन केले ट्रेस; पोलिसांनी शिताफीने आरोपीला ठोकल्या बेड्या
13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान पत्रकार मोहन दुबे यांनी आरोपी व त्याच्या मित्रांना मागील पंधरा दिवसांपूर्वी आरोपी हा गांजा सेवन करीत असताना हटकले होते. त्यांनी गांजा पिण्यास मनाई केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी वजीर उर्फ बरकात शेख (26) याने पत्रकार मोहन दुबे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाठीवर डाव्या […]
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास व नीतिमूल्ये’ यावरती मार्गदर्शन संपन्न
सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये व्यक्तिमत्व विकास व नीतिमूल्ये, संभाशन कौषल्य, ताण – तणाव व्यवस्थापन यासाठीचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महादेव घोंगडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. संजय बैस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नीतिमूल्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आज काल नीतिमूल्ये धुळीस मिळत चालली आहेत,पैसे मिळवणे प्रवृत्ती आहे व तो सन्मानाने मिळवावा विकृतीने मिळवू नये असे त्यांनी सांगितले. आपली वागणूक कशी असावी, माणसांमधला माणूस जागृत झाला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगायला आलोय. तुम्ही तुमच्या जिद्दीने,चारित्र्याने तुम्ही पुढे चालत रहा सुख आपोआप तुमच्या मागे लागेल.चांगली […]
पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा 500 किमी ट्रेनने प्रवास
औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने मृत पत्नीसोबत 500 किलोमीटरचा ट्रेनने प्रवास केल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या घटनेची सहप्रवाशांना देखील कल्पना नव्हती.पतीला सुद्धा पत्नीची मृत्यू झाल्याची माहिती नव्हती. मात्र नंतर ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर या घटनेचा उलगडा झाला. पती आपल्या आजारी पत्नीला घेऊन लुधियानाला उपचारासाठी जात होता. यावेळी ट्रेनमध्ये काही […]
प्रेयसीसमोरच झाली मारहाण, तरुणाने घेतला गळफास
प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. प्रतीक संतोष कूतवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्या विरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश पठारेने प्रतीकला त्याच्या प्रेयसीसमोरच मारहाण केली होती. हीच बाब जिव्हारी लागल्याने प्रतीकने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक […]
लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी बेतली मोठ्या भावाच्या जीवावर; छातीत कोपरखळी मारून खून
लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मोठ्या भावाच्या छातीत जोराने कोपरखळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सेंट्रल हॉस्पिटलनजीक असलेल्या ज्यूस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुष्कर नितीन धुळे (वय २९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम […]











