सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये व्यक्तिमत्व विकास व नीतिमूल्ये, संभाशन कौषल्य, ताण – तणाव व्यवस्थापन यासाठीचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महादेव घोंगडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. संजय बैस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नीतिमूल्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आज काल नीतिमूल्ये धुळीस मिळत चालली आहेत,पैसे मिळवणे प्रवृत्ती आहे व तो सन्मानाने मिळवावा विकृतीने मिळवू नये असे त्यांनी सांगितले. आपली वागणूक कशी असावी, माणसांमधला माणूस जागृत झाला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगायला आलोय. तुम्ही तुमच्या जिद्दीने,चारित्र्याने तुम्ही पुढे चालत रहा सुख आपोआप तुमच्या मागे लागेल.चांगली पुस्तके वाचा धीर आणि आधार पुस्तके देत असतात.प्रत्येकाने आयुष्यत आठवणीत राहतील असे चांगले काम करून दाखवा. असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप प्रा. डी ए पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.