ताज्याघडामोडी

गुगल पेद्वारे पैसे पाठवून लोकेशन केले ट्रेस; पोलिसांनी शिताफीने आरोपीला ठोकल्या बेड्या

13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान पत्रकार मोहन दुबे यांनी आरोपी व त्याच्या मित्रांना मागील पंधरा दिवसांपूर्वी आरोपी हा गांजा सेवन करीत असताना हटकले होते. त्यांनी गांजा पिण्यास मनाई केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी वजीर उर्फ बरकात शेख (26) याने पत्रकार मोहन दुबे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाठीवर डाव्या बाजूस कमरेच्यावर धारदार चाकू भोसकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 307 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पवार आणि गुन्हे प्रगटीकरण पथक आरोपीला शोधण्यासाठी रवाना करण्यात आले होते. आरोपी वजीर उर्फ युसुफ बरकात शेख यांनी यापूर्वी जिओ तसेच एअरटेल गॅलरीमध्ये काम केलेले असल्यामुळे त्याला मोबाईल लोकेशन व इतर गोष्टींचे ज्ञान होते.

त्याने त्याचा पत्ता लागू नये म्हणून स्वतःचा मोबाईल नंबर न वापरता कोणत्याही प्रकारे लोकेशन न येण्याची खबरदारी घेत होता. तेव्हा पोलिसांचे पथक सलग दोन दिवस रात्र अथक परिश्रम घेऊन आरोपीला ज्या वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत होता. त्या व्यक्तींना चौकशीकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून माहिती मिळवून आरोपीच्या एका मित्राने गुगल पे द्वारे दोनशे रुपये पाठवले असता मोबाईल क्रमांक हा कळंबोली सेक्टर 24 येथील पानवाल्याचा असल्याची माहिती मिळवली. नंतर आरोपी मागील तीन दिवसांपासून सायंकाळी सिगारेट घेण्याकामी या पानवाल्याच्या टपरीवर येत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे साध्या वेषात पोलिसांनी सापळा रचला आणि काही कालावधीनंतरच आरोपीला तेथून बेड्या ठोकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *