राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे […]
ताज्याघडामोडी
महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? ‘हे’ 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर
राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले. मात्र अजूनही […]
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅक ए प्लस दर्जा प्राप्त
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. चेतन पिसे यांनी ही माहिती दिली. या समितीने १८ व १९ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवस “राष्ट्रीय मूल्यांकन आणि […]
तीन वेळा प्रेयसीचा गर्भपात, पण लग्न दुसऱ्या तरुणीशी जमवलं, रागाच्या भरात तिने विषयच संपवला!
देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना घडत आहेत. पण त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालमा गावात लग्नाच्या पाच दिवसांपूर्वी रवी गोप नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी हत्येची उकल करत गुमला पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीचे […]
नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेला आली गुड न्यूज: सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, असे आहे नवे दर
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीमध्ये सरकराने मोठी कपात केली आहे. १ मे पासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किमती १७१.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आता हा सिलिंडर १ हजार ८५६.५० रुपयांना मिळणार आहे. नव्या दराची अंमलबजावणी आज म्हणजे १ मे पासून सुरू होणार आहे. सरकारने […]
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार? अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दावे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर थेट पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार असं जाहीर केलं होतं. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली […]
‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
“कर्माटेक 2K23” चे शानदार उद्घाटन, अनेक समजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यानी अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्राद्यान यांची योग्य सांगड घालून समजाभिमुख संशोधन करावे. केवळ चाकोरीबद्द अभ्यास न करता आपल्यामधील कमतरतेला आव्हान देऊन ज्ञान संपादन करावे. कर्मयोगीच्या “कर्माटेक 2K23” या तंत्रपरिषदेतून मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होऊन नवीन शोध जन्माला येतील असा विश्वास इलेक्ट्रोड्राईव्ह पॉवर ट्रेन सोल्यूशन प्रा. लि. […]
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती; महाविकास आघाडीचा बोलबाला
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४७ पैकी ९४ ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. दुपारी २ वाजेपर्यंतच्या निकालानुसार, त्यामध्ये मविआ ५५ तर भाजप आणि शिवसेनेचे ३० ठिकाणी वर्चस्व दिसून येत आहे. यामध्ये भाजप २५ तर शिवसेना ७ ठिकाणी बाजी मारत आहे. राष्ट्रवादीने २७ ठिकाणी तर काँग्रेसने २२ ठिकाणी विजय मिळवला आहे. ठाकरे गटाचा ६ तर इतर […]
प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध, तरुणीने गुपचूप उरकला साखरपुडा; नंतर घडली भयानक घटना
मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्धपित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात घडली आहे. प्रभाकर शेट्टी असे हल्ले करणाऱ्या वृद्ध नागरिकाचे नाव असून त्याने पत्नी आणि स्वतःच्या मुलीवर हातोडा आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आरोपी प्रभाकर शेट्टी याला वर्सोवा पोलिसांनी अटक […]
ठाकरे गटाला मोठा दिलासा, पक्षाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारला पाय उतार व्हावे लागले होते. यामुळे शिसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडे असलेली पक्षाची संपत्ती ही शिंदे गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका […]











