ताज्याघडामोडी

नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेला आली गुड न्यूज: सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, असे आहे नवे दर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीमध्ये सरकराने मोठी कपात केली आहे. १ मे पासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडर्सच्या किमती १७१.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आता हा सिलिंडर १ हजार ८५६.५० रुपयांना मिळणार आहे.

नव्या दराची अंमलबजावणी आज म्हणजे १ मे पासून सुरू होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर मुंबईत १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किमत १ हजार ८०८.५० रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये यासाठी १ हजार ९६०.५० रुपये, चेन्नईत २ हजार ०२१.५० रुपये द्यावे लागतील.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार याआधी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत २ हजार ०२८, कोलकातामध्ये २ हजार १३२, मुंबईत १ हजार ९८० तर चेन्नईत २ हजार १९२.५० रुपये मोजावे लागत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *